Jal Jivan Mission : पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा

Water Supply Scheme : ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionAgrowon

Pune News : ‘‘ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अपूर्ण कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ पूर्ण करावीत,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते गुरुवारी (ता. ४) बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते.

Jal Jeevan Mission
Jal Jivan Mission : कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणार

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन (हर घर जल)अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. सुरू असलेल्या कामांची माहिती जिओ टॅगिंग केलेली तसेच भौगोलिक माहिती प्रणालीत भरलेली असावी.’’

Jal Jeevan Mission
Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

‘‘ग्रामपंचायत स्तरावर कामांसाठी जागा हस्तांतरित करताना अडचण येत असल्यास त्याची यादी संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी. भोर, दौंड, इंदापूर व आंबेगाव तालुक्यांतील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. १९ ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यावाचून प्रलंबित असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कामे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय ठेवून पूर्ण करावीत,’’ अशा सूचना श्री. दिवसे यांनी दिल्या.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘सर्व स्तरावर समन्वय ठेवून कामे तातडीने पूर्ण करावीत. एकही काम प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.’’ श्री. पाथरवट यांनी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत सादरीकरणानद्वारे माहिती दिली.

जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या १ हजार २३९ योजना सूरू असून त्यापैकी २३५ योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या आहेत, तर ३६६ ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची कार्यवाही गतीने करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com