Sarthi : ‘सारथी’चे मुख्यालय, विभागीय उपकेंद्रांचे काम पूर्ण करा ; उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Ajit Pawar News : सारथी’ संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. १३) दिले.
SARATHI
SARATHIAgrowon

Sarthi News : ‘‘‘सारथी’ संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. १३) दिले.

SARATHI
SARATHI : ‘सारथी’द्वारे शेतकरी कंपन्यांसाठी प्रशिक्षण

पुण्यासह राज्याच्या कुठल्याही भागातील महत्त्वाचे विकास प्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी अडून राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये हे प्रकल्पही तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक झाली.

SARATHI
‘सारथी’ची स्वायत्तता कायम राखण्याचे आश्वासन; संभाजीराजे यांचे उपोषण मागे

पवार यांनी बैठकीत पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकासप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विकासप्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य आणि केंद्र शासनाची मंजुरी मिळविणे, निविदा प्रक्रिया गतिमान करणे, विकासकामांच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटविणे, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करणे, प्रशासकीय तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे आदी बाबी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पवार म्हणाले, ‘‘पुणे मेट्रो रेल्वेच्या तिन्ही प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. पुणे बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाने वेग घेतला आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल. अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामांसाठी टेंडरप्रक्रिया सुरू झाली आहे. वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही मार्गी लागले आहे.’’

रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग किनाऱ्यालगतचे गेला पाहिजे, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन महामार्गाच्या आराखड्याचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

गणपती सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका व्यवस्थित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम लवकर पूर्ण होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com