Sugar factory : जय महेश कारखान्याविरोधात फसवणूक प्रकरणी ईडीकडे तक्रार

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्याकडे तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस घेऊन जातात.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Beed Sugar Factory News : माजलगाव तालुक्यातील ६ हजार शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची रक्कम व्याजासह देण्याचे आदेश असतानाही जयमहेश कारखान्याने (Jaymahesh Sugar Factory) शेतकऱ्यांची फसवणूक करून एफआरपीवरच्या (FRP) व्याजाचे ८ कोटी २ लाख रुपये थकविल्या प्रकरणी थेट सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी दिली.

Sugar Factory
Sharad Pawar Sugar: साखर कारखाना नीट चालवण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष भलतीकडेच... शरद पवारांचा टोला

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्याकडे तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस घेऊन जातात.

गळीत हंगाम २०१९ मध्ये जयमहेश कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास मोठा विलंब केला होता. या प्रकरणी शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभीषण थावरे यांनी सातत्याने आवाज उठवत साखर आयुक्तांकडे धाव घेत तक्रार दिली होती.

कार्यक्षेत्रातील ६ हजार शेतकऱ्यांना एफआरपीच्या व्याजाचे ८ कोटी २ लाख रुपये देण्यासाठी बैलगाडी मोर्चा, प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर मोर्चा आंदोलन करूनही जयमहेश कारखान्याला जाग येत नव्हती. यामुळे निगरगट्ट असलेल्या कारखान्याविरोधात ईडीकडे तक्रार करावी लागली.
गंगाभीषण थावरे, शेतकरी नेते, माजलगाव, जि. बीड
जय महेश कारखान्याने शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक केलेली नाही. शेतकऱ्यांच्या संमतीनेच व्याजाची रक्कम अदा केलेली नाही. कारखाना प्रशासनाने कायम शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. जय महेश कारखाना प्रशासन कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.
सुजय पवार, मुख्य शेतकी अधिकारी, जय महेश साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com