Nandurbar News : अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत आर्थिक अनियमिततेवरून तक्रार

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचा निधीतून तीन कोटी २८ लाख ७९ हजार रुपये आर्थिक अनियमितता प्रकरणी गुरुवारी (ता.१३) रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गटविकास अधिकारी महेश पोतदार यांच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Grampanchyat
Grampanchyat Agrowon

Nandurbar News : अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचा निधीतून (Garmpanchyat Fund) तीन कोटी २८ लाख ७९ हजार रुपये आर्थिक अनियमितता प्रकरणी गुरुवारी (ता.१३) रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गटविकास अधिकारी महेश पोतदार यांच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतील अनियमितता प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३१ मार्च २०२३ रोजी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना दिले होते.

मात्र १३ दिवस उलटूनही गटविकास अधिकारी यांनी तक्रार दाखलके ली . दरम्यान, दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भूषण कीर्तिकुमार पाडवी यांनी आंदोलन केले होते.

Grampanchyat
Grampanchyat Election In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतींच्या १११ जागांसाठी होणार मतदान

जगदीश बोराळे (तत्कालीन प्रशासक), मनोज देव (तत्कालीन प्रशासक), विजयसिंग जाधव (तत्कालीन ग्रामविकास अधिकारी), उषाबाई बोरा (तत्कालीन सरपंच), आनंदा पाडवी (तत्कालीन ग्रामविकास अधिकारी), उमेश पाडवी (तत्कालीन अध्यक्ष, ग्रामकोश समिती, अक्कलकुवा), राजेश्री पाडवी (तत्कालीन सदस्य, ग्रामकोश समिती, अक्कलकुवा),

ईश्वर वळवी (तत्कालीन अध्यक्ष, ग्रामकोश समिती,मक्राणीफळी, अक्कलकुवा), सुपडीबाई पाडवी (तत्कालीन सदस्य, ग्रामकोश समिती, मक्राणीफळी, अक्कलकुवा), अमरसिंग वळवी (तत्कालीन अध्यक्ष, ग्रामकोश समिती, मिठ्याफळी,अक्कलकुवा) व लता प्रतापसिंग पाडवी (तत्कालीन सदस्य, ग्रामकोश समिती, मिठ्याफळी, अक्कलकुवा)

...अशी आहे अनियमितता

सन-२०१६-१७,२०१७-१८,२०१८-१९ या तीन आर्थिक वर्षातील लेखापरीक्षणात एकूण तीन कोटी ३४ लाख ७९ हजार ४९३ एवढी रक्कम आहे. परंतु सन-२०१८-१९ लेखा परीक्षण अहवालातील परिच्छेद क्र.३४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोग निधीतून ग्रामनिधीत ६ लाख वर्ग केले.

ती रक्कम ग्रामनिधीकडून १४ वा वित्त आयोग निधीकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु ती रक्कम जमा केलेली नाही. त्यात तीन कोटी २८ लाख ७९ हजार ४९३ रुपये एवढी रक्कम अनियमितता घोषित करण्यात आली आहे.

संबंधित प्रशासक, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना लेखी देऊनही अहवाल सादर करण्यात आले नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com