
Pune News : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (बारामती, जि. पुणे) कार्यक्षेत्रात अनेक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी उसाचे १०० टन उत्पादन घेण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहे. मांडकी (ता. पुरंदर) गावातील पाच शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षी गळीत हंगामात गावातील प्रगतिशील शेतकरी शिवाजी दत्तात्रय मोरे यांनी एकरी ११० टन उसाचे उत्पादन घेतले होते. त्यांचा आदर्श घेत अनेक प्रयोगशील शेतकरी यंदा एकरी उसाचे शंभर टन उत्पादन घेण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहेत. या स्पर्धेमध्ये प्रयोगशील शेतकरी संजय जगताप यांनी यंदाच्या हंगामात को ८६०३२ जातीचे एकरी ११० टन उत्पादन घेतले.
सुधारित तंत्राने पीक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात चांगली वाढ मिळाली. माती परीक्षणानुसार शेतकरी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खताचा वापर करतात. पाचटाची दरवर्षी कुट्टी करून जमिनीत मिसळत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. खताच्या खर्चात एकरी पाच हजार रुपयांची बचत होत आहे.
काटेकोर नियोजनावर भर ः
मांडकी गावातील ११३० ऊस उत्पादक साखर कारखान्यांचे सभासद आहेत. दरवर्षी विविध प्रयोग करत एकरी शंभर टनांचा पल्ला त्यांनी गाठला आहे. जमीन मशागत, खतांचा संतुलित वापर, आंतरमशागत आदी पीक व्यवस्थापनासाठी एकरी एक लाखांपर्यंत खर्च येतो. गेल्या वर्षी प्रति टन ३,६७१ रुपये दर मिळाला होता, यंदा गावातील पाच शेतकऱ्यांनी १०० टन ऊस उत्पादनापर्यंत मजल गाठली आहे.
सध्या गावातील २५ शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांहून अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जमिनीची चांगली मशागत, जातिवंत बेण्याच्या रोपांची लागवड, शिफारशीनुसार सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा, पाण्याच्या काटेकोर नियोजनासाठी ठिबक, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीचे आमचे नियोजन असते.
यंदा गावातील २० शेतकऱ्यांनी ९० टन उत्पादनापर्यंत झेप घेतली आहे. यंदा मला खोडव्याचे एकरी ७० टन उत्पादन मिळेल असा अंदाज आहे, अशी माहिती ऊस उत्पादक शेतकरी शिवाजी मोरे यांनी दिली.
संपर्क ः शिवाजी मोरे, शेतकरी, ९८५०४१०६४८
शंभर टन उत्पादन घेतलेले शेतकरी :
शेतकरी -- ऊस क्षेत्र --- उत्पादन (टन)
दीपक सावंत -- ४० गुंठे --- १०२
अशोक शिंदे -- ४४ गुंठे --- १२०
मानसिंग साळुंके -- ४० गुंठे -- १०६
सचिन गायकवाड -- ४० गुंठे -- १०७
संजय जगताप --- ४० गुंठे -- ११०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.