Farmer Suicide : आत्महत्याग्रस्त १८ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी लाखाची मदत

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Jalgaon Farmer News : जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmer Suicide) वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये (Compensation) देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने (Farmer Suicide Committee) मंजुरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) समितीच्या बैठकीत नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत २७ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.

त्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र, तर नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली आहे.

Indian Agriculture
Farmer Suicide : पंधरा तासाला एक शेतकरी आत्महत्या

...अशी आहेत पात्र प्रकरणे

पात्र शेतकऱ्यांमध्ये (कै.) समाधान भीमराव वाघ (मुक्तळ, ता. बोदवड), आनंदा रामभाऊ पाटील, (एणगाव, ता. बोदवड), संजय सीताराम सोनवणे (शेलवड, ता. बोदवड), देवमन शंकर सोनवणे (चोरगाव, ता. धरणगाव)

गणेश दगडू पवार (भोकर, ता. जळगाव), दीपक श्रावण जोहरे (फत्तेपूर, ता. जामनेर), विकास ऊर्फ सोनू नथ्थूसिंग पाटील (जवखेडा, ता. जळगाव), पंकज राजेंद्र पाटील (गणपूर, ता. चोपडा), अनिल श्‍यामराव पाटील (मोहरद, ता. चोपडा), ज्ञानेश्‍वर विठ्ठल गायकवाड (शेंदुर्णी, ता. जामनेर), ज्ञानेश्‍वर संजय धनगर (ताडे, ता. एरंडोल)

Indian Agriculture
Amravati Crop Insurance : अमरावती जिल्ह्यात २४ हजारांवर शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

संजय मिठाराम महाजन (धरणगाव), गोरख ईश्‍वर महाजन (नंदगाव बुद्रुक, ता. एरंडोल), रघुनाथ त्र्यंबक कुंभार (तारखेडे, ता. पाचोरा), वाल्मीक वामन पाटील (पिंपळगाव खुर्द प्र.भ., ता. पाचोरा), सचिन प्रकाश पाटील (मनूर, ता. बोदवड), ज्ञानदेव श्रावण मंडलिक (भानखेडा, ता. बोदवड) या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com