
Nandurbar News : पडणारा पाऊस हा जलस्त्रोतांचा एकमेव घटक असून, वर्षभर पाणीसाठा शाश्वत ठेवायचा असेल तर पावसाळ्यात प्रत्येक थेंब नागरीकांनी लोकसहभागातून भूगर्भाचे पुनर्भरण करावे, शासकीय योजनेचा आधार घेऊन नदी-नाले व पाणलोट क्षेत्र वाढवावे, असे आवाहन धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले.
या वेळी विस्तार अधिकारी पी. एस. पवार, एम. डी. खर्डे, प्रवीण प्रशिक्षक सीमा पाडवी, मच्छिंद्र हिरणवाडे, आर. डी. राजपूत, प्रतीक कदम, राजेश ईशी, सुरेश महाले, रवी गोसावी आदी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य प्रवीण प्रशिक्षक सीमा पाडवी यांनी काही सत्र घेतले.
जलजीवन मिशन अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था भागधारकांना पाणीपुरवठा योजना शाश्वत करण्यासाठी ‘स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ प्रशिक्षण जल शक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, नवनिर्माण सर्व समाजहितार्थ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागधारकांचे दोन दिवशीय क्षमता बांधणी प्रशिक्षण धडगाव येथे झाले.
प्रशिक्षणासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर प्रशिक्षणसत्र घेतले जात आहे.
प्रशिक्षणामध्ये ग्राम, आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमधील निवडक पाच सदस्य, ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात सरपंच, उपसरपंच, सचिव आशा वर्कर, अंगणवाडी सेविका जलसुरक्षक आदी सदस्यांचाही समावेश आहे. प्रशिक्षणासाठी ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षक म्हणून राजेश ईशी, सुरेश महाले, सीमा पाडवी, मच्छिंद्र हिरणवाडे, प्रतीक कदम, रवी गोसावी, संजय वळवी, सुषमा सूर्यवंशी, आरती पाटील यांनी काम पाहिले. सहभागी झालेल्यांना वाचन साहित्य, जेवण व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी माळी, अश्विनी चौधरी, मनीषा पाडवी, मंदा पाडवी, अश्विनी गावित, पाडवी अंजली, मनीषा बारेला, जमुना वसावे, मंदा पाडवी, अमिषा पाडवी, निशा पावरा यांनी परिश्रम घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.