LPG Cylinder Price Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सिलिंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात २०९ रुपयांपर्यंत कपात केली आहे. नवे दर आज १ ऑगस्टपासून लागू आहेत. या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरिंग आणि इतर व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे..कोलकातामध्ये १९ किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २०९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर दिल्लीत २०२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोलकाता येथे १९ किलोचा सिलिंडर आजपासून २,८७२.५० रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत या सिलिंडर दरात १९४ रुपयांची कपात झाली असून तो आता २,६९१.५० रुपयांना मिळेल. .LPG Cylinder Price: मोठा दिलासा; व्यावसायिक गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी स्वस्त .ही दरातील कपात केवळ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी लागू आहे. जुलैमधील कपातीनंतरची व्यावसायिक एलपीजीच्या दरांत झालेली ही सलग दुसरी कपात आहे. १ जुलै रोजी व्यावसायिक सिलिंडर दरात १८३.५० रुपयांची कपात केली होती. दोन टप्प्यात सिलिंडरच्या दर एकूण ३८० रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. .Ujjwala LPG Subsidy: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का, अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर.पश्चिम आशियातील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. परिणामी, व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. ७ मार्चपासून चार टप्प्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे १,३४५ रुपयांची वाढ झाली होती. यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.