Groundwater Pollution
Groundwater Pollution Agrowon

Groundwater Pollution : कूपनलिकेतून रंगीत पाणी

Colored Water : प्रदूषित पाणी जमिनीत झिरपून भूगर्भातील पाणी दूषित होऊन एमआयडीसीलगतच्या काही गावांमधील कूपनलिकेचे पाणी रंगीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Published on

Boisar News : बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून रासायनिक सांडपाणी नाल्यावाटे अनधिकृतपणे सोडले जाते. हे प्रदूषित पाणी जमिनीत झिरपून भूगर्भातील पाणी दूषित होऊन एमआयडीसीलगतच्या काही गावांमधील कूपनलिकेचे पाणी रंगीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

याबाबत पास्थळ ग्रामपंचायतीने उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर, उपप्रादेशिक अधिकारी, म.प.नि.मंडळ तारापूर, तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे दावा दाखल केला असून त्याची सुनावणीही सुरू आहे. गठित केलेल्या समितीने पास्थळ परिसरामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून त्या परिसरातील सहा ते सात बोअरवेलच्या पाण्याचे नमुने एनएबीएल या नामांकित प्रयोगशाळेत पाठविले आहेत, मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.

Groundwater Pollution
Groundwater Conservation : वीजमंडळाचा तोटा कमी करेल वाढणारे भूजल

आतापर्यंत अनेक कारखान्यांवर कारवाई केली असतानाही कारखान्यातील प्रदूषित पाणी बाहेर सोडण्याबाबत कोणताही परिणाम झाला नाही. भगेरिया कंपनीमधून येणाऱ्या धुरामुळे आत्मशक्तीनगरासह परिसरात प्रचंड वायुप्रदूषण होते. त्याचा परिणाम शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांचे आरोग्य बिघडले

एमआयडीसीतील सांडपाणी नाल्यावाटे सोडण्यात येत असल्याने ते पाणी जमिनीत झिरपून कूपनलिकेच्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. याचा विपरीत परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

Groundwater Pollution
Panchganga River Pollution : पंचगंगा नदीत रसायन मिश्रीत पाणी; प्रदुषण मंडळ निवांत, नागरिकांच्या जिवाशी खेळ

जातात नोटिसा, पुढे काय?

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून पाण्यातील रासायनिक घटक तपासले जातात. मापदंडापेक्षा कमी जास्त घटक आढळल्यास संबंधित कंपन्यांना नोटीस दिली जाते, मात्र त्यानंतर नोटिसांचे काय होते, असा सवाल उपस्थित होत आहे.

नेहमी होते नमुन्यांची तपासणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर विभाग-एककडून तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांना प्रदूषणासंदर्भात जानेवारीपासून १६ कारणे दाखवा नोटीस, ६ प्रस्तावित आदेश, १२ अंतरिम आदेश व एका कारखान्याला बंदचे आदेश बजावण्यात आले आहेत.

वायू प्रदूषणामुळे भातपीक नष्ट

तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात वायू व जल प्रदूषण होते. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात गॅस व रासायनिक सांडपाणी सोडले जाते. पास्थळसह परिसरातील भातीपिकांवर परिणाम होत आहे. यामुळे भाजीपालाही जळून गेला आहे, तर अनेकदा भातपिके नष्टही झाली आहेत. शेतकऱ्यांचे हे सतत नुकसान होत असल्याने कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या परिसरातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत कारवाई केली जाईल.
राजू आर. वसावे, उप्रदेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
तारापूर औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गेल्या शुक्रवारी हवेचे नमुने घेतले आहेत. ऑनलाइन मोंडिंग हवेचे निर्देशांक बरोबर होते.
वीरेंद्र सिंग - तारापूर औद्योगिक अधिकारी तारापूर २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com