Sugarcane Production : उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस, जिल्हाधिकाऱ्यांनी केली घोषणा

Kharip Season : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
Sugarcane Production
Sugarcane Productionagrowon

Kolhapur Collector : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा, यासाठी वेळोवेळी निविष्ठांची तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक श्री येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात पार पडली.

यावेळी ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. उत्पादन वाढविण्याची स्पर्धा लागण्यासाठी उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस देऊ. ज्या तालुक्यात उसाचे विक्रमी उत्पादन घेईल, त्या कृषी अधिकाऱ्यास ही बक्षीस दिले देण्यात येईल.

यामुळे कृषी विभागाने उसाचे एकरी उत्पादन वाढवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे. गावपातळीवरील बैठका प्रभावीपणे राबवून खरिपाला लागणारी बियाणे, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. ऊस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतू पाऊस कमी झाला तरीही उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. सन २०२४ -२५ मध्ये पीक कर्ज वाटपाचा लक्षांक ३८५८ कोटी असून हा लक्षांक वेळेत पूर्ण करा.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देवून शासकीय योजनांचा लाभ, विमा सुरक्षा मिळवून द्या. तसेच पीक कर्ज मुदतीत वितरीत करा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम व कर्जवाटप मुदतीत करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना मशागत व पेरणी पूर्व मार्गदर्शन करा. क्षारपड जमिनीत सुधारणा होण्यासाठी तसेच या जमिनीची उपयुक्तता वाढवण्यासाठी उपाययोजनांवर भर द्या. जिल्ह्यातील रेशीम उत्पादकता वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या.

Sugarcane Production
Kolhapur Sugar Factories : २८ महिन्यांचा पगार थकवला, कामगारांचा पीएफ भरला नाही, गडहिंग्लज कारखान्याची अवस्था बिकट

शेतकऱ्यांच्या गटामार्फत गांडूळ खत व सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्प उभारणी तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व शेतकरी गटांना मदत व प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्यातील बी - बियाणे व कीटकनाशके आदी निविष्ठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करा. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या स्पर्धा घेवून शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत.

तसेच सर्वाधिक उत्पादन घेत असलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा अन्य शेतकऱ्यांना उपयोग करुन द्या. प्रती एकरी सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कर देवून उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रोत्साहन द्या. जिल्ह्यात नॅनो युरियाचा वापर अत्यल्प असून याच्या वापराबाबत अधिक जनजागृती करुन किमान २५ टक्के वापर करुन देशात अग्रक्रमी राहण्यासाठी नियोजन करा, असे जिल्हाधिकारी श्री. येडगे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com