Weather Conditions For Grapes: ढगाळ वातावरणात घ्यावयाची काळजी
Cloudy Conditions: सर्वच द्राक्ष विभागांमध्ये आठवडाभर वातावरण कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी ढग सर्व ठिकाणी एकसारखे नसतील. काही ठिकाणी काही वेळासाठी चांगला सूर्यप्रकाश मिळेल, तर काही ठिकाणी भरपूर ढग राहतील.