Amaravati News : चांदूरबाजार तालुक्यात शुक्रवारी (ता. १५) ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. .चांदूरबाजार तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी यांना मंगळवारी (ता. १९) देण्यात आलेल्या निवेदनातून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात शुक्रवारी (ता. १५) ढगफुटीसदृश पावसाची नोंद करण्यात आली. काही तासांच्या पावसातच पिकाचे मोठे नुकसान झाले. .Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.नदी, नाल्यांना पूर आला इतकेच नाही तर अनेक घरांची पडझड झाली. माधान, देऊरवाडा, सोनोरी, ब्राह्मणवाडा ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. यातील काही गावे ही पूर्णपणे पाण्याखाली आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव वाचविण्यासाठी घराच्या छताचा आधार शोधावा लागला. .त्याचवेळी घरातील साहित्याचे मात्र नुकसान झाले. त्यानंतरही गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शेतीदेखील पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, तूर, कपाशी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची दखल घेत प्रशासनाने तत्काळ सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे..Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .या वेळी विजय राऊत, योगेश इसाळ, नीलेश डांगे, वासुदेव देशमुख, जीवन टिंगणे, राहुल कुचे, अमोल चौधरी, परवेज अहेमद, दिनेश चौधरी, सुनील देशमुख, विलास देशमुख, गणेश आठवले, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. .संत्रा बागायतदारांचा विचार व्हावाढगफुटीसदृश पावसाने परिपक्व अवस्थेतील संत्रा फळांची गळ झाली. संत्रा बागायतदारांचे यात मोठे नुकसान झाले असून त्याचादेखील भरपाईत विचार व्हावा, अशी देखील मागणी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.