Honey Production: सांचॉन्ग काउंटी, दक्षिण कोरिया (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा परिणाम आता केवळ पिकांवरच नव्हे, तर मधमाशीपालन व्यवसायावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. वाढते तापमान, ऋतुचक्रातील बदल, फुलांचा लवकर येणारा आणि अल्पकाळ टिकणारा बहर, तसेच मधमाश्यांवरील रोग व परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे दक्षिण कोरियातील मध उत्पादकांना आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे..मधमाशीपालन व्यवसायात येऊ घातलेल्या संकटांबाबत येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांचॉन्ग काउंटी येथील ६५ वर्षीय मधमाशीपालक पार्क ग्योंग-जे गेली जवळपास पाच दशके या व्यवसायात आहेत. १९७९ मध्ये अवघ्या आठ मधपेट्यांपासून त्यांनी सुरुवात केली होती. आज त्यांच्या ताब्यात सुमारे ११० मधपेट्या असून, त्यामध्ये जवळपास ८८ लाख मधमाश्या आहेत. मात्र बदलत्या हवामानामुळे हा व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे, असे ते सांगतात..Climate Change Impact: हवामानातील बदलाने काजू उत्पादक हवालदिल.पार्क हे स्थलांतराच्या माध्यमातून मधमाशी पालन करतात. देशाच्या वेगवेगळ्या भागांत येणाऱ्या फुलांच्या बहरानुसार ते मधपेट्या ट्रकद्वारे देशभर फिरवत असतात. पूर्वी दक्षिण आणि मध्य भागातील हवामानात मोठा फरक असल्याने विविध टप्प्यांत फुलांचा बहर येत असे. त्यामुळे मध संकलनासाठी अधिक काळ उपलब्ध होत होता. आता वाढत्या तापमानामुळे देशभरात फुले जवळपास एकाच वेळी उमलत असल्याने मध संकलनाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे..पूर्वी बाभळीच्या फुलांपासून मध गोळा करण्यासाठी चार वेळा स्थलांतर करावे लागत असे. आता हा आकडा दोन फेऱ्यांवर आला आहे. मध उत्पादनाचा हंगामही एक-दोन महिन्यांपुरता मर्यादित झाला आहे. १९९० च्या दशकाच्या तुलनेत मध उत्पादनात सुमारे ७० टक्क्यांची घट झाल्याचे पार्क यांनी सांगितले. पूर्वी २० ते २३ दिवसांत ८ ते ९ वेळा मध काढणी होत असे, तर आता ती ४ ते ५ वेळांपर्यंत मर्यादित झाली आहे..अन्नसुरक्षेलाही धोकाहवामान बदलामुळे जगभरात मधमाश्यांच्या संख्येत घट होत असल्याचे विविध संशोधनांमधून समोर आले आहे. सफरचंद, स्ट्रॉबेरी, टोमॅटो यांसारख्या अनेक पिकांच्या परागीभवनासाठी मधमाश्या अत्यावश्यक आहेत. त्यामुळे मधमाश्यांची संख्या घटल्यास अन्नसुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..Climate Change Impact: गव्हाला बसतोय हवामान बदलाचा फटका.दक्षिण कोरियाच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०२३ या कालावधीत स्थलांतरित मधमाशीपालनातील मधपेट्यांची संख्या १४ टक्क्यांनी घटून ८.१३ लाखांवर आली आहे. तसेच मधमाश्यांसाठी उपयुक्त असलेले मधस्रोत क्षेत्र २०२० मध्ये १.४६ लाख हेक्टर इतके राहिले असून, ते १९७०-८० च्या दशकाच्या तुलनेत सुमारे ७० टक्क्यांनी कमी आहे..कांगवॉन राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी जानेवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार, हवामान बदलाचा वेग कायम राहिल्यास २०४० ते २०६० या कालावधीत दक्षिण कोरियातील मधमाश्यांच्या परागीभवन क्षमतेत सरासरी ५३.५ टक्क्यांची घट होऊ शकते..तंत्रज्ञानाच्या मदतीने उपायांचा प्रयत्नदक्षिण कोरिया सरकार हवामान बदलाचा सामना करू शकतील अशा सक्षम मधमाशांच्या निर्मितीसाठी संशोधन करत आहे. मधमाश्यांना आकर्षित करणाऱ्या अधिक मधुरसयुक्त वृक्षांची लागवड, तसेच स्मार्ट मधमाशीपालन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी २०३० पर्यंत ४८.६ अब्ज वॉन (सुमारे ३२.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात येणार आहे..दरम्यान, पार्क यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मधपेट्यांमध्ये कॅमेरे बसवून मधमाश्यांच्या वसाहतींच्या वाढीवर ‘रिअल टाईम’ लक्ष ठेवण्याची व्यवस्था ते उभारत आहेत. त्यांची कन्यादेखील या व्यवसायात रुची घेत असून भविष्यात तीच हा व्यवसाय सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.