Kolkata News : देशात यंदा विशेषत: उत्तरेकडील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आदी राज्यांत ढगफुटी, भूस्खलनाच्या घटनांत वाढ झाली आहे. केवळ नैसर्गिक भूरचनेमुळे नव्हे तर हवामान बदल, पावसाचा बदललेला पॅटर्न, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील बांधकामे आदींमुळे देशात भूस्खलनाच्या घटनांची वारंवारिता आणि तीव्रता वाढत आहे, असे भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षणचे महासंचालक असित साहा यांनी (जीएसआय) म्हटले आहे. ही परिस्थिती आणखी धोकादायक बनत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. साहा यांनी जीएसआयच्या येथील मुख्यालयात ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. .भूस्खलनाला प्रदूषण थेट कारणीभूत नसल्याचे नमूद करत ते म्हणाले, की हवा प्रदूषण आणि हरितगृह वायू उत्सर्जनाची हवामान बदलात महत्त्वाची भूमिका आहे. भारतासह जगभरात अनेक भागांत पावसाचा पॅटर्न बदलत असल्यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील राज्यांत भूस्खलनाच्या घटना वाढत आहेत. भूगर्भीय रचना, हवामान परिस्थिती आणि मानवनिर्मित कारणांमुळे आपल्या देशातील पर्वतीय प्रदेश भूस्खलनासारख्या घटनांना संवेदनशील बनत आहेत..Uttarakhand Landslide: उत्तराखंडमध्ये पुन्हा प्रकोप .विशेषत: हिमालय आणि पश्चिम घाटाचा यात समावेश आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक व मानवनिर्मित दोन्ही कारणांमुळे भूस्खलनाची वारंवारिता व तीव्रता वाढत आहे. त्याचप्रमाणे, हिमालयाच्या उंच भागात भूस्खलनामुळे नदीखोऱ्यांमध्ये हिमतलावांची निर्मिती होऊन ते फुटणे हाही गंभीर धोका ठरत आहे. हे तलाव फुटल्यानंतर खालील भागांत पूर येतो व पर्वत उतारात अस्थिरता निर्माण होते, असेही नमूद केले..ते म्हणाले, ‘‘ नैसर्गिकरित्या तीव्र उताराच्या प्रदेशात भूस्खलनाचा धोका अधिक असतो. अशा ठिकाणी दगड, माती, ढिगारे आदी गुरुवात्कर्षणामुळे सहजपणे सरकू शकतात. अगदी किरकोळ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित हस्तक्षेपामुळेही उतार अस्थिर होऊन भूस्खलनाची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. हिमालयातील अनेक भाग भूकंपाच्या सक्रिय क्षेत्रांत मोडतात. येथील भौगोलिक रचना तुलनेने तरुण, तडकलेली व हवामानामुळे झिजलेली असल्याने ती कमकुवत बनते. .Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत.त्यामुळे मुसळधार पावसात किंवा भूकंपाच्या हालचालींमध्ये या रचना सहज खचण्याची शक्यता अधिक असते. यातच मॉन्सूनच्या बदललेल्या पॅटर्नमुळेही भूस्खलनाच्या घटना वाढत असून मानवी हस्तक्षेपामुळे पर्वत उतार अस्थिर होऊन पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाल्यांची प्रणाली विस्कळीत होत आहे. त्यामुळे हा प्रदेश अस्थिर होत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले..भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या तपासण्या आणि भूस्खलन संभाव्यता नकाशा अभ्यासातून दिसून आले आहे की, वृक्षतोड व वनस्पती आच्छादन काढल्याने डोंगर उतारांची स्थिरता मोठ्या प्रमाणात कमी होते..मुसळधार किंवा दीर्घकाळ पडणाऱ्या संततधारेमुळे माती, दगडातील आर्द्रता वाढते. त्यातून त्यातील छिद्रांचा दाब वाढून एकसंधता कमी होते. यामुळेही भूस्खलनाच्या घटना वाढत आहेत. मानवी हस्तक्षेप, विकासकामे, जंगलतोड, रस्त्यांची बांधकामे आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळेही या प्रदेशातील अस्थिरता वाढत आहे.- असित सहा, महासंचालक, जीएसआय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.