Pawar-Fadnvis Politics : पवार-फडणवीस यांच्यात निर्णय स्थगितीवरून खडाजंगी

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खटके उडाले.
Ajit Pawar vs Devendra Fadanvis
Ajit Pawar vs Devendra Fadanvis Agrowon
Published on
Updated on

"तुमची पहिली टर्म असेल, आम्ही सात-सात टर्म इथे आहोत. ही महाराष्ट्रातील (Maharashtra) कामं आहेत. कर्नाटक (Karnataka) आणि गुजरातची कामं नाहीत," असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. राज्यात ग्रामपंचायत (Gram Panchayat)निवडणुकीचा धुरळा उडलेला असताना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यात चांगलीच जुंपली होती.

यावर फडणवीस म्हणाले, "तुम्ही सात सातवेळा निवडून आला असाल, आम्ही कमी वेळा निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याच कडून शिकलो. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अजित पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचे काम तुम्ही केलं होत. माझ्या स्वतःतच्या मतदार संघामधली कामं रोखण्यात आली. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाहीत."

Ajit Pawar vs Devendra Fadanvis
Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खटके उडाले. याच मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांविरुद्ध आक्रमक झाल्याचे दिसले.

"आम्ही अनेक सरकारं बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचं सरकार बघितलं, देवेंद्रजी तुमचंही सरकार 5 वर्ष बघितली. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामं कधी थांबली नव्हती”,असेही अजित पवार यांनी सुनावले. अजित पवार बोलत असताना मात्र त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते.

पवार-फडणवीस यांच्यात विधानसभेचे अध्यक्षांनी मध्यस्थी केली. त्यांनी अजित पवारांना खाली बसण्याची विनंती केली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, "अध्यक्ष महोदय हा प्रश्नोत्तराचा तास आहे. आम्हाला अधिकार आहे." पवार बोलत होते, विरोधी आमदारांची घोषणाबाजी सुरु होती. त्यादरम्यान अजित पवारांचा माईक बंद करण्यात आला.

Ajit Pawar vs Devendra Fadanvis
Ajit Pawar : लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू

ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू, कोणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असं फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com