Ahilyanagar News: राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाची पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी मतदार यादी केली आहे.२४ जानेवारीला तपशील दुरुस्तीची मुदत संपलेली असल्याने प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीवर मतदार संघातील चार हजार सहाशे दोन हरकती व १ हजार ६९२ दावे दाखल करण्यात आले आहेत. या हरकती ७ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर या मतदारसंघांमध्ये आता पोटनिवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या तयार करण्याचे काम चालू आहे..Local Body Elections: अलिबाग जिल्ह्यात रंगणार रणसंग्राम.राहुरी विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठीची मुदत २४ जानेवारीला संपली आहे. ६ ते २४ जानेवारीपर्यंत दावे, हरकती मागवल्या होत्या. आता हरकती मागवल्या आतापर्यंत मतदार संघात ४ हजार ६०२ हरकती व १ हजार ६९२ दावे दाखल करण्यात आले होते. ३ व ४ जानेवारी रोजी सुनावणी घेऊन ७ फेब्रुवारीपर्यंत हरकती निकाली काढून त्यानंतर १४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे..Local Body Elections: सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादींना सहानुभूतीची शक्यता.राहुरी विधानसभा निवडणुकीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष मोहिमेअंतर्गत ६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर त्या यादीवर दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. दाखल हरकतीवरून पाथर्डी तालुक्यातील ३८ गावात वेगळीच चर्चा सुरू असून या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या २ हजार ३०० हरकतीमध्ये हरकत दाखल करणाऱ्यांनाच याबाबत माहिती नसल्याचे चर्चा सुरू आहे..हरकतींवरून गोंधळहरकत दाखल करणाऱ्यांच्या याद्या सोशल मीडियावर झळकल्यानंतर संबंधितांना आपल्या नावाने मतदार यादीवर हरकती दाखल झाल्याचे समजले आहे. मात्र, ही हरकत आपण दाखल केली नसल्याचा दावा अनेकांनी केला असून यामुळे दाखल हरकतींवरून पाथर्डी तालुक्यात गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र, आलेल्या हरकती निकाली काढण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.