CJP Protesters Detained In Delhi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) आजपासून (दि. १० ऑक्टोबर) दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सीजेपी समर्थक आंदोलक दिल्लीत दाखल होत आहेत. पण पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्लीतील विमानतळावर विमानात असतानाच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. .मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनासाठी दिल्लीला जात असताना अटकेच्या कारवाईला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे दिपके यांनी याआधीच म्हटले होते. लोकांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. .CJP Delhi Protest: ‘सीजेपी’चे दिल्लीत आज पुन्हा आंदोलन.दिपके प्रवास करत असलेले विमान दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलिस विमानात दाखल झाले. त्यांनी दिपके यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले. "मी येथे अटक होण्यासाठी आलो आहे; मला अटक करा," असे दिपके यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी, "ही अटकेची कारवाई नाही. कृपया आम्हाला सहकार्य करावे," असे त्यांना समजावले..CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके.युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, आज सकाळी ८ वाजता युट्यूबर ध्रुव राठी यालाही दिल्ली पोलिसांनी गुरुग्राममध्ये ताब्यात घेतले. सीजेपीने एक निवेदन जारी करत ध्रुव राठी याला ताब्यात घेण्याच्या कारवाईचा निषेध नोंदवला. त्यांनी ध्रुव राठी आणि इतरांच्या सुटकेची मागणी केली आहे. दिल्लीतून सुमारे १ हजार आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे..३५ हजारांवर पोलिस तैनातदिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थान तैनात करण्यात आली आहे. यात ३५ हजार पोलीस कर्मचारी आणि २३ हजार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या जवानांचा समावेश आहे. .२५० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द, ४६ मेट्रो स्थानके बंददिल्लीत होत असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १७९ लोकल आणि सुमारे ७५ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस व मेलसह २५० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच ४६ मेट्रो स्थानके बंद केली आहेत..अजित नवले पोलिसांच्या ताब्यातदिल्ली येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यालयापासून हजारोच्या संख्येने सर्वजण जंतर मंतरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार व विरोधी पक्ष नेते जितेंद्र चौधरी, महाराष्ट्राचे माकप राज्य सचिव डॉ. अजित नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.