Ahilyanagar News: अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या कृषिपर्व महोत्सवात अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील नागरिक गर्दी करत आहेत. महोत्सवात प्रामुख्याने जामखेड तालुक्यातील ज्वारी, तर अकोले तालुक्यातील तांदळासह कडधान्याला अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहेत. महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे..तीन दिवसात महोत्सवात खरेदी-विक्रीतून पावणे दोन कोटी रुपयांच्या जवळपास उलाढाल झाल्याचे सांगण्यातआले. अहिल्यानगर येथे पुणे रस्त्यावर कृषी विभाग, जिल्हा परिषदेने आयोजित केलेला कृषिपर्व महोत्सव होत आहे..Warana Agri Expo: वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन.शनिवारी (ता. ७) महोत्सवाचा तिसरा दिवस होता. थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून लोकांनी साहित्य खरेदी करण्याची यामुळे संधी उपलब्ध झाली आहे. सोमवारी (ता. ९) महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे..Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद.शेतकऱ्यांना मार्गदर्शन, साहित्य खरेदी आणि शेतीसाठीचे नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याने शेतकरी, नागरिकांनी सहभागी होण्याचे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बाराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, उमेदचे समन्वयक सोमनाथ जगताप यांनी केले आहे..आम्ही दरवर्षी सात-आठ एकरावर खत न वापरता ज्वारीचे उत्पादन घेतो. प्रामुख्याने जामखेड तालुक्यातील ज्वारीला आणि त्यातही जुन्या दगडी वाणाच्या ज्वारीला लोकांची कायम मागणी असते. यंदा कृषिपर्व महोत्सवामुळे लोकांना ज्वारी खरेदी करणे सोपे झाले आहे. येथे ज्वारीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.विनोद हजारे, ज्वारी उत्पादक शेतकरी, जामखेड (जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.