Crop Varieties Selection : शिफारस केलेल्या वाणांची निवड करा

सोयाबीन लागवडीसाठी आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. घरच्या घरी बियाण्याची उगवणशक्ती तपासावी.
 Cultivation
CultivationAgrowon

Parbhani News : सोयाबीन लागवडीसाठी आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. घरच्या घरी बियाण्याची उगवणशक्ती तपासावी. उत्पादकता वाढीसाठी बुरशीनाशके, जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून रुंद वरंबा सरी (बी.बी. एफ.) पद्धतीने पेरणी करावी.

माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतांच्या मात्रा द्याव्यात. कपाशी लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी. गुलाबी बोंड अळीसह अन्य किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे असा सूर ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २५) राणीसावरगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे ॲग्रोवन व यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन आणि कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील ॲग्रोवन संवाद चर्चासत्रामध्ये उमटला.

 Cultivation
Indian Agriculture : उत्तम शेतीबरोबरच उभारली थेट ग्राहकांपर्यंत विक्री व्यवस्था

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषिविद्यावेत्ता तथा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. गजानन गडदे प्रमुक वक्ते म्हणून उपस्थित होते.

या वेळी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, यारा फर्टिलायझर्सचे कृषिविद्यावेत्ता अमोल जगदाळे, सरपंच कल्पना जाधव, मंडल कृषी अधिकारी बोबडे, कृषी सहायक गिरीश नागरगोजे, राजेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश महामुने, पंढरीनाथ राठोड, बालासाहेब चव्हाण, आकाश राठोड, आदर्श शिक्षक नारायण जाधव, ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर, सकाळ अॅग्रोवनचे वितरक प्रभाकर जाधव, यारा फर्टिलायर्सचे गणेश शेटे, दत्ता जाधव आदीसह शेतकरी उपस्थित होते.

डॉ. गडदे म्हणाले, की सोयाबीन पेरणीसाठी घाई करू नये. पेरणीपूर्वी घरी उगवशक्ती तपासावी. बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास कीड, रोगांना प्रतिबंध होतो. उत्पादकता वाढते.

बी. बी. एफ. पद्धतीने पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारण होते. पावसाचा खंडकाळ तसेच अतिवृष्टीच्या स्थितीत पीक तग धरून राहाते. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी केले, तर ‘सकाळ’चे बातमीदार भाऊसाहेब मकामल्ले यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com