Warehouse Project: कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजनेसाठी कृषी विभागाने पाच कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाचे संभाव्य नियोजन तयार केले आहे. या नियोजनामध्ये प्रामुख्याने चिया लागवड, गोदाम प्रकल्प, फार्म लॅब आणि मसाला पिके यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या कृषी विभागाने हा अहवाल सादर केला..शासनाने जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजना सन २०२६-२७ साठी नियोजन निश्चित केले असून, त्याअंतर्गत विविध उपक्रमांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. चिया लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार लाभार्थ्यांसाठी १ कोटी २५ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या अंतर्गत चिया पीक प्रात्यक्षिकांसाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांच्या मर्यादेत प्रति एकर ६,००० रुपये अनुदान देण्याचे नियोजित आहे. तसेच मसालावर्गीय पिकांच्या (सोप, ओवा, धने) लागवड प्रात्यक्षिकांसाठी ५०० लाभार्थ्यांसाठी ५० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्येही प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के मर्यादेत प्रति लाभार्थी ६,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या पिकांच्या प्रक्रिया व विपणन व्यवस्थेसाठी दोन लाभार्थ्यांसाठी ५० लाख रुपये प्रस्तावित असून, त्यांनाही प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे..Krishi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेतून अकोल्याला ५.६९ कोटी.शेतीमाल साठवणुकीसाठी आणि बाजारातील जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने गोदाम प्रकल्पाअंतर्गत १० लाभार्थ्यांसाठी १ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे अनुदान प्रामुख्याने शेतकरी गटांसाठी उपयुक्त ठरणार आहे..Farmer Support Scheme: २१ जिल्ह्यांच्या ७,२०१ गावांतील शेतकऱ्यांसाठी २५ कोटी ५९ लाखांचा निधी.फार्म लॅब या घटकाअंतर्गत ३५ प्रयोगशाळा उभारण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतबांधावर जैविक निविष्ठा उत्पादने तयार करण्यासाठी प्रयोगशाळा उभारून नैसर्गिक शेतीला चालना देणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हा यामागील उद्देश आहे. यासाठी प्रति लाभार्थी एक लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य तसेच प्रशिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे..याशिवाय ५४ लाख रुपये खर्चून १ हजार स्पायरल सेपरेटर वितरित करण्यात येणार आहेत. पिकांवरील किड नियंत्रणासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या सोलर लाईट ट्रॅपसाठी ५० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून, त्याअंतर्गत १ हजार सोलर लाईट ट्रॅप दिले जाणार आहेत..एकात्मिक शेती मॉडेल विकसित करणारएकात्मिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडलात एक असे ५२ एकात्मिक शेती मॉडेल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमासाठी एक कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.पाच कोटी ६९ लाख रुपयांच्या या निधीतून सुमारे साडेचार हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.