Education News : वीटभट्ट्यांवरील मुले शिक्षणाच्या प्रवाहात

Thane District News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी आदी भागांतील वीटभट्ट्यांवर महिला-पुरुषांसह त्यांची बालकेही मजुरीचे काम करत असतात.
Education News
Education NewsAgrowon

Thane News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी आदी भागांतील वीटभट्ट्यांवर महिला-पुरुषांसह त्यांची बालकेही मजुरीचे काम करत असतात.

या बालकांनी मोलमजुरीच्या कामाऐवजी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेत, वीटभट्ट्यांवरील बालकांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

त्यानुसार सध्याच्या घडीला वीटभट्ट्यांवरील ८३३ बालके शिक्षण घेत असून यामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यासह रायगड, नाशिक, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक राज्यातील बालकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात आजूबाजूच्या तालुक्यातील मजुरांसह पालघर, नाशिक, रायगड, नाशिक, जळगाव, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या राज्यांतून कुटुंबे मजुरीच्या कामासाठी येत असतात.

Education News
Vitbhatti Business : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा

यावेळी त्यांच्या सोबत त्यांची बालके असतात. या बालकांना अनेकदा वीटभट्ट्यांवर मजुरीच्या कामासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर ८३३ बालके असल्याचे आढळून आले.

या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना जवळच्या अंगणवाडीसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४४५ बालकांचा समावेश आहे.

समितीची स्थापना

काही महिन्यांपूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहापूर, भिवंडी तालुक्याला भेट दिली. शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांवर बालके असल्याचे आढळून आले. यामधील १२ ते १५ वयोगटातील बालके ही मोलमजुरीची कामे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या बालकांना वीटभट्टीवर काम न करू देता, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करून प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या बालकांचा शाळा प्रवेश करून घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी एक समिती गठीत केली.

Education News
Veterinary Education : ‘पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधनातून साम्य आरोग्य संकल्पना साकारावी’
ठाणे जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर आढळून येणाऱ्या सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे. तसेच जि. प. शाळांमध्ये मराठीचे शिक्षण देण्यात येत असते; परंतु या वीटभट्ट्यांवर आढळून आलेली अनेक मुले ही अमराठी भाषिक आहेत. त्यांना मराठीसह हिंदी भाषेतही शिकविण्यात येते. तसेच रोजगारासाठी कुटुंबासोबत स्थलांतरित झाली तरी त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण झाली तर ती शिक्षणाच्या प्रवाहात राहतील.
मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com