Ambadas Danve on Crop Damage : मुख्यमंत्र्यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी वांझोटी; दानवेंची सरकारवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.११) नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी केली.
Ambadas Danve On Cm
Ambadas Danve On CmAgrowon

Crop Damage Update : वादळी पाऊस आणि गारपीटीने (Hailstorm) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मंगळवारी (ता.११) नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे.

सरकारने मदत केली नाही तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा अंबादास दानवेंनी दिला आहे. ते म्हणाले, "सरकारची नुकसानग्रस्त भागांची पाहणी वांझोटी आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू."

Ambadas Danve On Cm
Eknath Shinde Latest : गारपीट आणि पावसाने बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा दानवे यांनी मांडली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. "सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा १०० टक्के शेतकऱ्यांना होत नाही.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकरी त्रासलेला आहे. सरकार यासंदर्भात त्वरित मदतीचा निर्णय घेतला पाहिजे." असे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.११) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु मदतची अद्याप काही घोषणा झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने सरकावर टिका केली आहे.

दरम्यान, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी भेटी करून पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com