Nitish Kumar : नितीश यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; आरजेडी आमदारांनी केला करेक्ट कार्यक्रम

Nitish Kumar
Nitish KumarAgrowon

Pune News : बिहारच्या राजकारणात आजचा दिवस फार महत्वाचा ठरला. आज सोमवार (१२ रोजी) बिहार विधानसभेत नितीश सरकारविरोधात विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. यामुळे बिहारमध्ये नितीश यांचा जलवा चालणार की ते बाद होणार याकडे देशातील जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान हा विश्वासदर्शक ठराव नितीश सरकारने जिंकला आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बाजूने एनडीए आणि जेडीयूला १२९ मते मिळाली. जी बहुमताच्या १२२ च्या आकड्यापेक्षा अधिक आहेत. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या आधी बिहारमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळाले. येथे नितीश कुमार यांचे ३ आमदार विरोधकांनी फोडले होते. तर नितीश यांनी देखील विरोधकांचे तीन आमदार थेट सत्ताधारी पक्षाच्या बेंचवर बसवले. तर राजदच्या तीन आमदारांनीच आपल्याच नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम केला.

विश्वासदर्शक ठराव जिंकला

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस, आरजेडीचा साथ सोडत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तसेच पुन्हा भाजपला सोबत घेत ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे नवे सरकार टीकणार की जाणार हे विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानातून समोर येणार होते.

Nitish Kumar
CM Nitish Kumar : नीतीश कुमार यांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ; दोन उपमुख्यमंत्री भाजपचे

यामुळे अनेकांच्या नजरा बिहारकडे लागल्या होत्या. आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यादरम्यान राजद आणि काँग्रेससह महाआघाडीत समाविष्ट असलेल्या सर्व आमदारांना पाटणातील तेजस्वी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. तर भाजप-जेडीयूच्या आमदारांना चाणक्य हॉटेल आणि पाटलीपुत्र हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

नितीश यांचे विश्वासदर्शक ठरावाला उत्तर

यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करत राहू असे २०२१ मध्येच सांगितले होते. त्याप्रमाणे राज्यात सात संकल्प सुरू केले, ते असेच सुरू राहतील. यांचा किती फायदा झाला हे सर्वांना माहित आहे. या सात संकल्पांमुळे बिहारचा विकास होईल.

आम्ही सर्व चौकशी आम्ही करू

आम्ही समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेऊ. आजपर्यंत पक्षातील लोक आमच्यासोबत होते. ते कधीच इकडे-तिकडे फिरकले नाहीत. पण तुमच्याकडे पैसे कोठून आले याची सर्व चौकशी आम्ही करू, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तसेच तुम्ही तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या. सध्या तुमचा पक्ष चांगला चालत नाही असेही नितीश यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्वांची काळजी घेऊ

तसेच जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण असेल तेव्हा मला भेटा आणि मी तुमची समस्या सोडवतो. आम्ही सर्वांची काळजी घेऊ. मात्र आम्ही राज्याच्या हितासाठी काम करत आहोत, राज्याच्या हिताचे काम केले जाईल. आम्ही तिघेच एकत्र राहू आणि तिघेही काम करणार असेही नितीश यांनी यावेळी म्हटले आहे.

बिहारमध्ये विश्वास नाही : तेजस्वी

बिहारच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी, सरकारमध्ये स्थिरता असल्याशिवाय विकास शक्य नाही असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. तर नितीश पुन्हा पल्टी मारणार नाहीत याची हमी मोदी घेतील का? असा सवाल देखील तेजस्वी यांनी केला. तर त्यांनी कर्पूरी ठाकूर यांच्यावरून भाजपवर निशाना साधताना नितीश कुमार यांच्यावर देखील टीका केली.

Nitish Kumar
Bihar Reservation : बिहारमध्ये ६५ टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर ; जात जनगणनेनंतर नितीश कुमारांचा मोठा डाव

ते म्हणाले, बिहारमधील जातीवर आधारित जनगणना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरलची नियुक्ती करण्यात आली. कर्पूरी ठाकूर यांनी माझ्या वडीलांसोबत त्यावेळी सरकारमध्ये काम केले. तेंव्हा त्या सरकारमध्ये जनसंघ होता हे तुम्ही विसरलात का? तर कर्पूरी ठाकूर यांनी नोकरीत आरक्षण वाढवलं तेव्हा त्यांना जनसंघानेच पदावरून हटवले. आज तेच भाजपवाले म्हणतात आरक्षण कुठून आले आणि मुख्यमंत्री, कुठे गेलात?

अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही

भारतरत्न आता फक्त एक व्यवहार झाला आहे. भाजपवाले आदर करत नाहीत, फक्त व्यवहार करतात. हे फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी सुरू आहे. पण आम्ही तत्त्वनिष्ठ आहोत. आम्ही एका जागी उभे राहतो आणि तेही आमच्या भूमिकेवर ठामपणे. माझे वडील लालू प्रसाद यादव आहेत. यामुळे या गोष्टींना आम्ही घाबरत नाही. आम्ही लढत राहू असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.

बिहार विधानसभेत बलाबल

बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. बहुमताचा आकडा १२२ असून आता एनडीएकडे १२८ सदस्य आहेत. ज्यामध्ये भाजपचे ७८, जेडीयू ४५, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) ४ आणि एक अपक्ष आमदार आहे. सध्या विरोधकांकडे ११४ आमदार आहेत. यामध्ये राजदचे ७९, काँग्रेसचे १९, सीपीआय (एमएल) १२, माकपचे २, सीपीआयचे २ आमदार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com