Kharif Season Crop : हरियाणात हमीभावावर धान खरेदी सुरू; शेतकऱ्यांना आता पर्यंत ३३८७ कोटींचे वाटप

Chief Minister Naib Singh Saini : चालू खरीफ हंगामातील पीकांची खरेदी हमीभावात हरियाणा सरकारने केली आहे. तर सरकार शेतकऱ्यांच्या खरीफ पिंकाचा एक-एक दाणा हमीभावावर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दिले आहे.
Haryana CM Nayab Singh Saini
Haryana CM Nayab Singh SainiAgrowon
Published on
Updated on

Pune News : हरियाणाच नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या ज्यात भाजपला चांगले यश मिळाले. तर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी शनिवारी (ता.१९) चंडीगडमध्ये नवगठित मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिंकाचा एक-एक दाणा हमीभावावर (न्यूनतम समर्थन मूल्य) खरेदी करावा अशा सूचना त्यांनी कृषि विभागाला दिल्या. यावेळी सैनी यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांचा खरीफ हंगामातील एक-एक दाणा खरेदी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

यावेळी सैनी यांनी यंदाच्या हंगामात धान आणि बाजरा खरेदी हमीभावावर केला जात आहे. आतापर्यंत ३० लाख मेट्रिक टन धानाची आवक झाली असून सुमारे २५,५५,३१९ मेट्रिक टनाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदी पोटी ३ हजार ०५६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच १३,९०,१९९ मेट्रिक टन धानाचा उठाव झाल्याचेही सैनी म्हणाले आहे. मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले की, ३.४७ लाख मेट्रिक टन बाजऱ्याची आवक झाली आहे. ज्यामध्ये ३.०५ लाख मेट्रिक टनाची खरेदी सरकारने केली आहे. तर ३३१ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Haryana CM Nayab Singh Saini
Nayab Singh Saini Oath Ceremony : हरियाणात दुसऱ्यांदा नायब सिंग सैनी राज!, सैनी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री

आम्ही शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष जाळू नयेत अशी विनंती केली होती. तसे आवाहन केले होते. त्याप्रमाणे राज्यात पिकांचे अवशेष जळण्याच्या घटनांमध्ये कमी आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. सरकार शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष न जळवण्यासाठी जागरूक करण्याचे काम करत आहे. त्यासाठी सब्सिडीवर विविध उपकरणे उपलब्ध करून देत असल्याचेही मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले.

तसेच पिकांचे अवशेष जळण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हरियाणा सरकारने ३ हजार २२४ नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. २०१८-१९ च्या कृषी हंगामापासून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पिकांटे अवशेष व्यवस्थापन करणारे (सीआरएम) मशीन उपलब्ध करून दिली जात आहेत. राज्य सरकार या मशीनच्या खरेदीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देत आहे. सीआरएम मशीनचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना १,००० रुपये प्रति एकर दिले जात आहेत. तसेच जे शेतकरी धानाचे अवशेष गोशाळांमध्ये पोहोचवत आहेत. त्यांना ५०० रुपये प्रति एकर प्रोत्साहनपर अनुदान दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com