Rice Export Market Fee Exemption: तांदूळ निर्यातीला चालना देण्यासाठी छत्तीसगड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने तांदूळ निर्यातदारांना बाजार शुल्कातून जी सवलत दिली होती; त्याला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. याबाबतची घोषणा नुकतीच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी केली..दुसऱ्या भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ शिखर परिषदेत संबोधित करताना साय यांनी सांगितले की, निर्यातदार आणि शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. तसेच जागतिक तांदूळ बाजारात छत्तीसगडचे स्थान मजबूत करेल..ही परिषद महत्त्वाची ठरली. कारण यानिमित्ताने १२ देशांतील खरेदीदार आणि सहा देशांच्या दूतावासाचे प्रतिनिधीमंडळ एकत्र आले. यातून राज्यातील तांदूळ खरेदीकडे परदेशी खरेदीदारांचा कल दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री साय यांनी नमूद केले..Rice Variety: ‘ट्रॉम्बे कोकण महान’ भाताची जात प्रसारित.छत्तीसगडचे वर्णन पूर्वीच्या पिढ्यांनी भाताचे कोठार म्हणून केला होता. राज्याने ही ओळख कायम ठेवली आहे. भात हा त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुरगुजा भागात उत्पादन घेतल्या जात असलेल्या जीराफूल आणि दुबराज तांदळाचा विशेष उल्लेख केला. ज्यांची सुवासिक तांदूळ म्हणून ओळख राहिली आहे. .India Rice Trade: जगातील तांदूळ व्यापारात भारताची आघाडी, पण जलसंकटाचीही भीती, नवीन निष्कर्ष काय सांगतात?.निर्यातदारांची अनेक वर्षांपासून मागणी असलेली बाजार शुल्क सवलत गेल्या वर्षी देण्यात आली होती. त्याची मुदत डिसेंबर २०२५ मध्ये संपणार होती. पण आता त्याला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीला आणखी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे..राज्यातील नवीन औद्योगिक धोरणात लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे तांदूळ प्रक्रिया उद्योग आणि निर्यात क्षमता मजबूत होण्यास मदत होईल. सध्या, छत्तीसगडमधून सुमारे ९० देशांमध्ये सुमारे एक लाख टन तांदूळ निर्यात केला जातो. यासाठी निर्यातदारांना सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली..ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भाताला प्रतिक्विंटल ३,१०० रुपये दर दिला जात आहेत. त्यासाठी प्रति एकर २१ क्विंटल खरेदीची मर्यादा आहे. गेल्या वर्षी सुमारे १४९ लाख मेट्रिक टन भात खरेदी केली होती. यावर्षी भात खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी, मुख्यमंत्री साय यांनी कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) च्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.