Sugarcane Rate : ‘छत्रपती’ने उसाचा दुसरा हप्ता ३०० रुपये द्यावा

FRP Installment : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला वार्षिक सर्वसाधरण सभा घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत वाढ मिळाली आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता ३०० रुपये प्रतिटन देवून सभासदांची दिवाळी गोड करा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने छत्रपती कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन देण्यात आले.

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला वार्षिक सर्वसाधरण सभा घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत वाढ मिळाली आहे. कारखान्याच्या प्रशासनाने वार्षिक सर्वसाधरण सभा घ्यावी तसेच उसाचा दुसरा हप्ता ३०० रुपये प्रतिटन देवून सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अॅड. संभाजी काटे, दिलीप शिंदे, शिवाजी निंबाळकर, सतीश काटे, विठ्ठल पवार, रामचंद्र निंबाळकर, संतोष चव्हाण, दत्तात्रेय ढवाण, बाळासाहेब शिंदे आदींनी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांना निवेदन दिले.

Sugar Factory
Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

यावेळी कार्यकारी संचालक अशोक जाधव, हनुमंत करवर उपस्थित होते. यावेळी जाचक यांनी सांगितले की, छत्रपती कारखान्याच्या बाबतीमध्ये दोन चुकीचे ठराव करण्यात आल्यामुळे सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठरावाची माहिती योग्य वेळी दिली जाईल.तसेच सहकारखात्याच्या चुकीच्या निर्णयामुळे छत्रपतीच्या सभासदांचे नुकसान होत आहे.रा ज्यामध्ये वाढत चाललेले खासगी साखर कारखाने चितेंचा विषय असल्याचे सांगितले.

Sugar Factory
Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात ३९ कोटी रुपयांची एफआरपी थकीत

जो बसेल तो दर देण्याचा प्रयत्न करणार

कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, सन २०२४-२५ च्या गाळप हंगामामध्ये तीन हजार रुपयांचा पहिली उचल देवून छत्रपती कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली होती. सध्या कारखान्याचे बॅलन्स शीट तयार करण्याचे काम सुरू असून जो बसेल तो दर देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण होणार आहे.

निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहेत. निवडणूक न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर लागली तर अडचण येऊ नये म्हणून ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ घेऊन ठेवली आहे. वार्षिक सभा होणारच असून, वार्षिक सभा घेण्यासाठी संचालक मंडळ टाळाटाळ करणार नाही. सभासदांनी गैरसमज करून घेऊ नये असे सांगितले.

थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार नसतो. मागील काळामध्ये छत्रपती कारखान्याच्या एका संस्थापक संचालकाने कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र केवळ सव्वा रुपये थकबाकी असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द झाला आहे.
- पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, छत्रपती कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com