Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ४) मतदान होत आहे. संचालकांच्या एकूण २१ जागांपैकी एका जागेसाठी उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने ती जागा रिक्त राहणार आहे. तर ८ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान होणार आहे..जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक, अशा ९ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, १,०५३ मतदार संचालक निवडीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रचाराचा कालावधी मतदानाच्या २४ तास आधी, म्हणजे शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८ वाजता संपला असून प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे..DCC Bank Election: अखेरच्या दिवशी ८३ उमेदवारांची माघार; १२ जागांसाठी रंगणार थेट लढत.आतापर्यंत ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक २६२ मतदार छत्रपती संभाजीनगर तालुक्यात, तर सर्वांत कमी ३२ मतदार खुलताबाद मतदान केंद्रावर आहेत..प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवड झालेल्या जागा वगळता कन्नड, गंगापूर, सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यांतील चार जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच बिगरशेती मतदारसंघातील पाच, महिला प्रतिनिधींच्या दोन आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एका जागेसाठीही मतदान होणार आहे..मतदान शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होईल. त्यानंतर रविवारी (ता. ५) सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली..District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध.या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत असून, दोन्ही बाजूंनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज या निवडणुकीत रिंगणात आहेत..विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनेलकडून उमेदवारी दिल्याने निवडणुकीत विशेष चुरस निर्माण झाली आहे..दरम्यान, वैयक्तिक मतदारसंघातून एकमेव अर्ज दाखल झाला होता; मात्र तो छाननीत बाद झाल्याने या मतदारसंघातील संचालकपद रिक्त राहणार आहे..यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या ८ जागांपैकी फुलंब्रीची एक जागा महाविकास आघाडीकडे, तर ७ जागा महायुतीच्या खात्यात गेल्या आहेत. त्यामुळे संचालक मंडळात बहुमत मिळविण्यासाठी महायुतीला उर्वरित १२ पैकी किमान ४ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.