Fertilizer fraud : कृषी निविष्ठांमधील फसवणूक खपवून घेतला जाणार नाही

Kharif Season Update : खरीप हंगामात प्रत्येकवेळी निकृष्ट निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची बोळवण करण्याचे प्रकार घडतात.
Fertilizer
Fertilizer Agrowon

Kharif Season In Amravati : खरीप हंगामात प्रत्येकवेळी निकृष्ट निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची बोळवण करण्याचे प्रकार घडतात. परिणामी त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा तिवसा पंचायत समिती उपसभापती रोशनी पुनसे यांनी कृषी विभागाला दिला आहे.

Fertilizer
Kharif Crop Loan : ...तर अशा बँकांवर एफआयआर दाखल करा ; खरीप हंगाम बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले

सद्या कृषी विभागाकडून खरीपपूर्व नियोजनाची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, रासायनिक खते पुरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याकरिता तालुक्‍यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडे कंपनीकडून पुरवठा झालेल्या कृषी निविष्ठांचे नमुने घेण्यात यावे, हे नमुने तपासणीकामी पाठविण्यात यावे. त्याआधारे निकृष्ट आढळल्यास संबंधितांविरोधात वेळीच कारवाई करावी.

तसेच, ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्यातील नुकसान टाळणे शक्‍य होणार आहे. त्यासोबतच वरखेड मंडळातील वेदर स्टेशनमध्ये असलेले तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी देखील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com