थोडक्यात माहिती...१) डिसेंबर २०२३ पासून सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क माफ केले, ३१ मार्च २०२६ पर्यंत सवलत वाढवली.२) या निर्णयामुळे आतापर्यंत ३५ लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आहे.३) कमी दरातील आयातीमुळे हरभरा, तूर, मूग, उडीद यांच्या भावात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान.४) कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अन्नमंत्री प्रल्हाद जोशींना पत्र लिहून ५०% आयात शुल्क लावण्याची मागणी केली.५) कृषी खर्च व किंमत आयोगाने (CACP) २०२५-२६ हंगामासाठी पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर बंदीची शिफारस केली..Pune News: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पिवळ्या वाटाण्याच्या निर्बंधमुक्त आयातीमुळे देशांतर्गत कडधान्यांच्या बाजारभावात होणारी घसरण आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कमी किमतीच्या या वाटणा आयातीमुळे हरभरा आणि इतर कडधान्यांच्या किमती कमी होत असून, शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळत नाही. .चौहान यांनी अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर ५० टक्के आयातशुल्क लावण्याची मागणी केली आहे. डिसेंबर २०२३ पासून आयात शुल्क माफ केल्याने ३५ लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात झाली, ज्यामुळे बाजारात अस्थिरता आणि भेसळीला प्रोत्साहन मिळत आहे..Yellow Pea Import: ‘वाटाण्या’च्या अक्षता.कृषिमंत्र्यांच प्रल्हाद जोशींना पत्र…चौहान यांनी अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे. सध्या पिवळ्या वाटाण्याची आयात किंमत प्रति क्विंटल ३ हजार ३५१ रुपये आहे, जी तूर, मूग आणि उडीद या प्रमुख कडधान्यांच्या हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. रशिया आणि कॅनडा येथून सध्या ३५५ ते ३६० डॉलर प्रति टन दराने आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्याचा उपयोग बेसन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्याचा वापर स्नॅक्स उद्योगामध्ये केला जातो..२०२४-२५ या पीक वर्षात हरभऱ्याचे उत्पादन ११.३३ दशलक्ष टन इतके आहे, जे देशातील एकूण कडधान्य उत्पादनाच्या सुमारे ५० टक्के आहे. चौहान यांनी म्हटले आहे की, कमी किमतीत होणारी पिवळ्या वाटाण्याची आयात इतर कडधान्यांमध्ये भेसळीला प्रोत्साहन देत आहे आणि बाजारभावातही अस्थिरता निर्माण करत आहे..Yellow Pea Import: मुक्त वाटाणा आयातीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ.यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. या मुद्यावर यापूर्वी आंतरमंत्रालय समितीच्या (IMC) बैठका झाल्या असून, ऑगस्ट महिन्यातील दोन बैठकींमध्ये पिवळ्या वाटाण्याच्या आयात धोरणाचा आढावा घेण्यात आला. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. .डिसेंबर २०२३ आयातशुल्क पूर्णपणे माफ…डिसेंबर २०२३ पासून सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील शुल्क पूर्णपणे माफ केले होते आणि ही सवलत वेळोवेळी वाढवत ३१ मार्च २०२६ पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत सुमारे 35 लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आहे. सध्या भारतातील आयातदारांकडे सुमारे १० लाख टन पिवळ्या वाटाण्याचा साठा आहे, तर देशांतर्गत उत्पादन ४ लाख ५० हजार टन आहे, जे देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे..कृषी खर्च आणि किंमत आयोगाने रब्बी हंगाम २०२५-२६ च्या किंमत धोरणात पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, अशा आयातीमुळे देशांतर्गत किमती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होत आहे. यापूर्वी २०१७ मध्ये हरभऱ्याच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आयात शुल्क लावण्यात आले होते..वारंवार विचारले जाणारे प्रश्न...१) पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर शुल्क माफ केले का ?सरकारने अजून तरी शुल्क माफ केले नाही.२) या आयातीमुळे शेतकऱ्यांना कसा तोटा होतो?कमी दरात आयात झाल्याने हरभरा व इतर कडधान्यांच्या बाजारभावात घसरण होते.३) सध्या पिवळ्या वाटाण्याचा आयात दर किती आहे?प्रति क्विंटल सुमारे ₹३ हजार३५१ (३५५-३६०) डॉलर प्रति टन).४) पिवळ्या वाटाण्याचा वापर मुख्यतः कुठे होतो?बेसन आणि स्नॅक्स उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.५) पूर्वी कधी शुल्क लावण्यात आले होते का?होय, २०१७ मध्ये देशांतर्गत हरभरा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ५०% आयात शुल्क लावले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.