Palghar News: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चारोटी ते पालघर ‘लाँग मार्च’ मंगळवारी (ता. २०) सायंकाळी दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शेतकरी, आदिवासी, कामगार आणि ग्रामीण जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी काढण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटले नाही तर ‘लाँग मार्च’ अधिक तीव्र करण्याचा इशारा, या वेळी देण्यात आला. .या मोर्चात शेतकरी, आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सुरुवातीला २५ ते ३० हजार मोर्चेकरी सहभागी झाले होते. वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर तालुक्यांतील नागरिक सहभागी होत गेल्याने मोर्चेकऱ्यांची संख्या आता वाढली आहे. हा मोर्चा दुपारी दोन वाजता चारोटी येथून निघून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर येथे पोहोचला. तेथे रात्री मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा पायी कूच करत मोर्चा रवाना झाला. दुपारनंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली..Palghar Long March: जल, जंगल, जमिनीसाठी शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ .२०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा ‘लाँग मार्च’ काढण्यात आला होता. त्या नंतर २०२३ मध्येही पालघरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मात्र जनतेला अपेक्षित दिलासा मिळालेला नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला..Long March : १५ हजार आंदोलक उतरले रस्त्यावर; मागण्या काय?.या वेळी राष्ट्रीय नेते अशोक ढवळे म्हणाले, ‘‘चर्चा करूनही या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून हटणार नाही. जनतेचा मोठा समुदाय संतप्त झाला आहे.’’.रोजगार, पाणी, वरकस जमिनी, रेशन, स्मार्ट मीटर हे प्रश्न सुटले नाहीत तर रेल रोको किंवा मुंबईकडे मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाईल. हे आंदोलन मध्येच सोडणार नाही. - अशोक ढवळे, राष्ट्रीय नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.