Illegal Sand Excavation : आमसभेत खडाजंगी! अवैध वाळू उपशावरून आमदार आमने-सामने

Pandharpur Aamsabha : अवैध वाळू उपशासह पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य अशा विविध प्रश्नांवर पंढरपूरच्या आमसभेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना लोकांनी चांगलेच धारेवर धरले.
Pandharpur Aamsabha
Pandharpur Aamsabha
Published on
Updated on

Pandharpur News : अवैध वाळू उपशासह पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य अशा विविध प्रश्नांवर पंढरपूरच्या आमसभेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना लोकांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ, केलेला आरडाओरडा आणि बेशिस्तीचे ही दर्शन झाले.

अवैध वाळू उपशाच्या मुद्द्यावरून आमदार समाधान आवताडे आणि आमदार राजू खरे यांच्यात खडाजंगी झाल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. एकूणच आजची आमसभा विविध मुद्द्यांवर गाजली. सलग आठ तासांनंतर आमसभेचे सूप वाजले.

तब्बल नऊ वर्षानंतर गुरुवारी (ता. पंढरपूर) माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आमसभा पार पडली. सभेला मोहोळचे आमदार राजू खरे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Pandharpur Aamsabha
Sand Excavation : वाळू ठेक्याविरोधात नांद्रा ग्रामस्थ आक्रमक

गुरुवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरवात झाली. गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी प्रास्ताविक करून २०१७ साली झालेल्या आमसभेतील ठरावाचे वाचन केले. त्यानंतर विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सुरवातीला पाटबंधारे, बांधकाम, महावितरण या विभागातील अधिकाऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या कामाचा आढावा सादर केला. यामध्ये भीमा पाटबंधारे विभागाविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या.

उजनी उजवा कालव्यातून फाटा क्रमांक ३३ ला पाणी मिळत नसल्याची तक्रार करकंब, पोहे, नांदोरे येथील शेतकऱ्यांनी केली. यावर आमदार अभिजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करा, अशी सूचना केली. महावितरणकडून जाळलेले डीपी वेळेत दुरुस्त करून दिले जात नाहीत , अशी तक्रार शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, सचिन पाटील, नितीन बागल यांनी केली. पाटंबाधरे विभागातील अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात अशी तक्रार मनसेचे तालुका प्रमुख शशिकांत पाटील, संदीप मांडवे यांनी केली.

Pandharpur Aamsabha
Illegal Sand Excavation : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करा

तर अरुण कोळी यांनी भीमा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपशाचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा आमदार समाधान आवताडे यांनी पोलिस कारवाई करत असल्याचे सांगत या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अरुण कोळी अधिकच आक्रमक झाले. अवैध वाळू उपशा विरोधात पोलिसांनी २२ कारवाया केल्याचे आमदार आवताडे यांनी निर्दशनास आणून दिले. तरीही कोळी यांनी अवैध वाळू उपशा विरोधात आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

या वेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांनाही अरुण कोळी यांच्या मागणीला पाठिंबा देत मोहोळ तालुक्यातील वाळू चोरी मी बंद केली आहे. मग पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरी का बंद होऊ शकत नाही, असा सवाल आमदार समाधान आवताडे यांना केला. यावेळी आमदार आवताडे आणि आमदार खरे यांच्यात वाळूच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी सारवासारव करत अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करावी, अशी सूचना महसूल विभागाला केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com