डॉ. सुजॉय साहा शीतल फराटेGrape Crop Protection: तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाश या घटकांमधील बदलांचा थेट परिणाम द्राक्षाच्या वाढीवर, उत्पादनावर आणि रोग प्रादुर्भावावर होतो. या वर्षात ‘एल निनो’मुळे होणारी तापमानातील वाढ, पर्जन्यमानातील असमानता आणि वातावरणातील आर्द्रतेतील बदल यांचा द्राक्ष पिकावरील बुरशीजन्य, जिवाणूजन्य व अन्य रोगांच्या प्रमाणात बदल दिसून येत आहे..‘एल निनो’ म्हणजे काय?‘एल निनो’ ही प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे निर्माण होणारी जागतिक हवामान घटना आहे. साधारणपणे ही घटना दर २ ते ७ वर्षांनी घडते आणि तिचा कालावधी ९ ते १२ महिने, काही वेळा १८ महिन्यांपर्यंत असू शकतो. हिंद महासागर द्विध्रुव (Indian Ocean Dipole - IOD) हा आणखी एक महत्त्वाचा हवामानविषयक घटक असून, त्याचा परिणाम हवामान घटनांसह विविध रोगांच्या प्रादुर्भावावर होऊ शकतो..भारतातील एल निनोचे स्वरूपभारतीय मॉन्सूनवर एल निनोचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. एल निनो आणि मॉन्सून यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा असला तरी बहुतांश एल निनो वर्षांमध्ये देशातील पर्जन्यमानात घट होण्याची प्रवृत्ती दिसून येते. मात्र प्रत्येक एल निनो वर्षात दुष्काळ पडतोच असे नाही. तथापि, एल निनोच्या काळात मॉन्सून उशिरा सुरू होणे, पावसाचे असमान वितरण, पावसातील दीर्घ खंड, काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस तर काही ठिकाणी अल्प कालावधीत अतिवृष्टी अशा परिस्थिती वारंवार आढळतात. याशिवाय, हवेचे तापमान दीर्घकाळ अधिक राहणे, उष्णतेच्या लाटा वाढणे आणि दिवस-रात्र तापमानातील चढ-उतार वाढणे यांसारखे बदलही दिसून येतात. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक भागांमध्ये या हवामानातील बदलांचा विशेषतः ऑक्टोबर ते मार्च या द्राक्ष उत्पादनाच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत परिणाम जाणवतो. या काळात तापमान, आर्द्रता आणि अवेळी पावसामध्ये होणारे बदल वेलींची वाढ, फुलोरा, फळधारणा तसेच डाऊनी मिल्ड्यू, भुरी आणि घडकुज यांसारख्या रोगांच्या प्रादुर्भावावर लक्षणीय परिणाम करतात..Climate Change Impact: ये तो ट्रेलर है.तापमान, आर्द्रता व अवेळी पावसाचा द्राक्ष पिकावर परिणामएल निनोमुळे तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमानात बदल होतो. वाढलेल्या तापमानामुळे उष्णताजन्य ताण निर्माण होऊन वाढ, फुलधारणा, फळधारणा आणि घडांची गुणवत्ता कमी होते. अवेळी पाऊस व वाढलेली आर्द्रता डाऊनी मिल्ड्यू, भुरी, केवडा, करपा व घडकुज यांसारख्या रोगांना पोषक ठरते. काढणीपूर्वी अवेळी पावसामुळे बेरी फुटणे, घड कुजणे, गुणवत्तेत घट व आर्थिक नुकसान होऊ शकते..केवडाकेवडा (डाऊनी मिल्ड्यू) हा द्राक्षावरील सर्वाधिक विनाशकारी बुरशीजन्य रोग आहे. हा रोग द्राक्षाच्या पाने, कोवळ्या फुटी, फुलोरे आणि घडांवर प्रादुर्भाव करून उत्पादन व गुणवत्तेमध्ये मोठी घट घडवून आणतो. या रोगाच्या विकासासाठी २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान, ९० टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता आणि पानांवर दीर्घकाळ टिकणारा ओलावा या बाबी अनुकूल मानल्या जातात.वातावरण उष्ण व कोरडे राहिल्यास रोगाचा प्राथमिक संसर्गात घटतो. त्यांची बीजाणू निर्मिती (स्पोरुलेशन) कमी होते आणि रोगाचा प्रसारही तुलनेने मंदावतो. मात्र अवेळी पाऊस पडून उष्ण व दमट वातावरण निर्माण झाल्यास परिस्थिती पूर्णपणे बदलते. अशा वेळी रोगकारक बुरशी प्लॅस्मोपॅरा विटिकोलाची बीजाणू निर्मिती आणि प्रसार वेगाने होऊन नवीन फुटींवर तीव्र संसर्ग होतो. अनुकूल हवामान सलग काही दिवस टिकून राहिल्यास संपूर्ण द्राक्षबागेत डाऊनी मिल्ड्यूचा झपाट्याने उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे हवामानाचा सातत्याने आढावा घेऊन रोगाचे नियमित निरीक्षण, बागेत खेळती हवा ठेवणे आणि प्रतिबंधात्मक बुरशीनाशक फवारणी या आधारे व्यवस्थापन करावे..भुरीभुरी (पावडरी मिल्ड्यू) हा रोग इरीसिफी निकेटर या बुरशीमुळे होतो. डाऊनी मिल्ड्यूप्रमाणे त्याच्या विकासासाठी पानांवर मुक्त पाण्याचा ओलावा किंवा जास्त पर्जन्यमान आवश्यक नसते. २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि तुलनेने कोरडे वातावरण ही भुरीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. एल निनोच्या काळातील सातत्याने होणारी तापमानातील चढ-उतार, सकाळचे दवाचे प्रमाण, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रतेतील बदल आणि उष्ण कोरडे वातावरण या बाबी रोगाच्या प्रादुर्भावास चालना देते. विशेषतः फुलोरा अवस्थेत रोगाचा प्राथमिक संसर्ग होऊन तो वेगाने पाने, फुलोरा व घडांवर पसरतो. परिणामी फुलांची गळ, अपूर्ण फलधारणा, बेरींच्या सालीवर तडे पडणे, फळांचा रंग, आकार व गुणवत्ता खालावणे, तसेच उत्पादन आणि निर्यातक्षम दर्जात घट होते. या अवस्थांमध्ये रोगाचे नियमित निरीक्षण करणे, योग्य छाटणी करून वेलींमध्ये खेळती हवा राखणे, अतिरिक्त नत्र खतांचा वापर टाळणे, हवामानाचा अंदाज घेऊन रोग पूर्वसूचनांच्या यांच्या आधारे FRAC मार्गदर्शक तत्त्वांनुसार गट बदलून सल्फर किंवा शिफारस केलेल्या भुरीनाशकांची वेळेवर प्रतिबंधात्मक फवारणी करावी. बागेमध्ये स्वच्छता राखून एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा..बुरशीजन्य करपाअँथ्रॅक्नोजशास्त्रीय नाव ः कोलेटोट्रिकम ग्लोईओस्पोरिओइड्सहा द्राक्षावरील एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने उष्ण - दमट हवामानात व पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. या रोगामुळे पाने, कोवळ्या फुटी, वेली आणि फळांवर काळसर, खोलगट वर्तुळाकार डाग निर्माण होतात. त्यामुळे झाडाची वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. या वर्षी एल निनोमुळे पर्जन्यमान कमी राहिले, तसेच वातावरण तुलनेने कोरडे राहण्याची शक्यता पाहता आवश्यक ओलाव्याअभावी अँथ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव मर्यादित राहू शकतो. मात्र अवेळी पाऊस पडून आर्द्रता वाढल्यास रोगकारकाची बीजाणू निर्मिती व प्रसार वेगाने होतो. परिणामी, कोवळ्या भागांवर जलद संसर्ग होऊन रोगाची तीव्रता वाढते आणि संपूर्ण द्राक्ष बागेत त्याचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण होते..जिवाणूजन्य करपा (Bacterial Leaf Spot)जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल लीफ स्पॉट) हा रोग झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस पीव्ही. व्हिटिकोला या जिवाणूमुळे होतो. उष्ण व दमट हवामानात त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो. दीर्घकाळ उच्च तापमानानंतर अचानक पाऊस पडल्यास आणि वातावरणातील सापेक्ष आर्द्रता वाढल्यास रोगकारक जीवाणूंच्या वाढीस व प्रसारास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. पावसाच्या थेंबांद्वारे आणि वाऱ्याच्या साहाय्याने हे जिवाणू झाडाच्या कोवळ्या पानांवर व फुटींवर सहज पसरतात. परिणामी, नवीन पानांवर सुरुवातीला लहान, पाणचट (water soaked) स्वरूपाचे डाग दिसू लागतात. पुढे ते तपकिरी किंवा काळसर रंगाचे होऊन वाढतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानांची प्रकाशसंश्लेषण क्षमता कमी होते, वेलींची वाढ मंदावते आणि एकूणच उत्पादन व फळांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. या रोगाच्या प्रतिबंधासाठी बागेतील स्वच्छता, बागेत खेळती हवा ठेवणे,पाण्याचा निचरा आणि हवामानावर आधारित व्यवस्थापन आवश्यक ठरते..Climate Change Impact: जागतिक तापमान वाढीमुळे द्राक्ष शेतीमधील समस्या वाढणार.हवामान बदल आणि रोगांचा भविष्यकालीन धोकाहवामानातील बदलामुळे द्राक्ष पिकावरील रोगांचे स्वरूप, तीव्रता आणि भौगोलिक वितरण यामध्ये लक्षणीय बदल होत आहेत. वाढते तापमान, पर्जन्यमानातील अनिश्चितता, वातावरणातील आर्द्रतेतील चढ-उतार आणि हवामानातील तीव्र बदल यांमुळे अनेक रोगकारकांना नवीन प्रदेशांमध्ये स्थायिक होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामी, पूर्वी विशिष्ट भागांपुरते मर्यादित असलेले रोग इतर द्राक्ष उत्पादक क्षेत्रांतही आढळू लागलेआहेत..नवीन रोग आणि रोगकारक उदयास येण्याची शक्यता वाढत आहे.हवामानातील अनुकूल बदलांमुळे रोगकारकांचा जीवनचक्र कालावधी वाढू शकतो.एका हंगामात अनेक वेळा संसर्ग होऊन रोगाची तीव्रता वाढू शकते.रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुरशीनाशकांचा वारंवार वापर करावा लागतो. त्यातून बुरशींमध्ये त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोकाही वाढत आहे.या बदलत्या परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी भविष्यात हवामान मॉडेल, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंवेदन , भौगोलिक माहिती प्रणाली आणि रोग पूर्वसूचना प्रणाली यांचा वापर अधिक महत्त्वाचा ठरणार आहे..हवामान मॉडेलच्या साहाय्याने तापमान,पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता आणि इतर हवामान घटकांतील भविष्यातील बदलांचा अंदाज घेऊन रोगाच्या प्रादुर्भावाचा संभाव्य कालावधी ओळखता येतो.कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान, रोग, मृदा आणि पिकांशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून रोगाचा धोका अचूकपणे भाकीत करते. त्यामुळे योग्य वेळी फवारणी व व्यवस्थापनाचे निर्णय घेणे शक्य होते..दूरसंवेदन तंत्रज्ञानाद्वारे उपग्रह, ड्रोन आणि विविध सेन्सरच्या साहाय्याने द्राक्षबागेतील पिकांची वाढ, वनस्पतींवरील ताण आणि रोगाची प्रारंभिक लक्षणे मोठ्या क्षेत्रात जलद ओळखता येतात.भौगोलिक माहिती प्रणालीच्या (GIS) माध्यमातून रोगाचा प्रादुर्भाव, हवामान आणि भौगोलिक माहिती एकत्रित करून जोखीम नकाशे तयार करता येतात. त्यामुळे स्थाननिहाय रोग व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते.रोग पूर्वसूचना प्रणाली वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि पानांवरील ओलावा यांसारख्या हवामान घटकांच्या आधारे रोगाचा संभाव्य प्रादुर्भाव आगाऊ सूचित करते..महत्त्वाच्या शिफारशीहवामानातील अनिश्चितता आणि त्यातून उद्भवणाऱ्या रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक रोग व्यवस्थापन (Biointensive) पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. हवामान अंदाजावर आधारित रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यानंतर बुरशीनाशक फवारणीचे योग्य नियोजन करावे.बागेतील आर्द्रता कमी राहण्यासाठी योग्य छाटणी करून वेलींमध्ये पुरेसे वायुवीजन राखावे.संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचे असून, नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. कारण कोवळ्या फुटींवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो..बुरशीनाशकांचा वापर नेहमी शिफारस केलेल्या मात्रेत आणि योग्य वेळी करावा.बुरशीनाशक प्रतिकार टाळण्यासाठी एकाच रासायनिक गटातील बुरशीनाशकांचा सतत वापर न करता FRAC मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची अदलाबदल करावी.याशिवाय रोगग्रस्त पाने, फांद्या आणि इतर अवशेष वेळेवर नष्ट करून बागेची स्वच्छता राखावी.शक्य असल्यास हवामान-आधारित रोग पूर्वसूचना (Disease Forecasting) सेवांचा उपयोग सुरू करावा. त्या आधारे वेळीच व्यवस्थापन केल्यास रोगांमुळे होणारे नुकसानीचे प्रमाण मर्यादित राखता येते..व्यवस्थापनामध्ये जैविक नियंत्रणाचा समावेश करावा. एकात्मिक जैव उत्पादन आधारीत व्यवस्थापनामुळे (Biointensive IDM) बुरशीनाशकांचा वापर व त्यांचे अवशेष कमी होण्यास मदत होते. द्राक्षबागेतील उपयुक्त सूक्ष्मजिवांचे संतुलनही टिकून राहते. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा अस्पेरेलॉइड्स ही बुरशी तर जिवाणूंमध्ये बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनास फ्लुरोसन्स यांचा वापर करता येतो. सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान किंवा पावसाळ्यात ट्रायकोडर्माचा वापर फायदेशीर ठरतो. ॲम्पिलोमायसिस ही बुरशी भुरीची उत्तम नियंत्रक आहे. उच्च आर्द्रतायुक्त वातावरणात ट्रायकोडर्माच्या दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्या १० दिवसांच्या अंतराने केल्यास हानिकारक रोगांपासून बचाव होतो. बॅसिलस सबटिलिसचा वापर फळछाटणीच्या ६० दिवसांनंतर १० दिवसांच्या अंतराने करावा. त्यामुळे द्राक्षातील बुरशीनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते. एण्डोफायटिक अल्टरनेरिया अल्टरनेटा या जैविक बुरशीचा वापर केल्यामुळे द्राक्षाच्या केवडा रोगाच्या बीजाणूंवर नियंत्रण येऊन रोग नियंत्रण होण्यास मदत झाली आहे.टीप : द्राक्ष पिकातील रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकांचा वापर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावरील ‘अनेक्श्चर ५’ मधील अद्ययावत शिफारशींनुसार करावा.डॉ. सुजॉय साहा ७०६६२४०९४६प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.