
Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Sangli Agriculture Produce Market Committee) गेल्या चार दिवसांत राजकीय घडामोडी वेग आला आहे. कार्यक्षेत्रातील मिरज, कवठे महांकाळ व जत तालुक्यातील राजकीय मांडणी सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले असले तरी, सांगली बाजार समितीसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वसंतदादा पाटील घराण्याची एकी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर वसंतदादा पाटील यांचे वर्चस्व राखण्यासाठी विशाल पाटील, जयश्री पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
परंतु निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस हे पक्ष तयार होणार का, या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली.
वास्तविक पाहता, बाजार समितीत महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजप पक्ष आणि शिवसेना (शिंदेगट) या दोन पक्षांची भूमिका अजून जाहीर केली नाही.
त्यामुळे भाजप पक्ष आणि शिवसेना वेगवेगळी निवडणूक लढवणार की युती करून लढणार याबाबत कोणीही दुजोरा दिला नसल्याचे चित्र आहे.
बाजार समिती कार्यक्षेत्रात मिरजेचे भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह खासदार संजय पाटील यांच्या भूमिककडे सर्वांचे लक्ष आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पक्षाची किती ताकद आहे, हे दाखवण्याची संधी सर्वांना असणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.