Malegaon News: कृषी, पशुसंवर्धन, प्रक्रिया, मूल्यवर्धनासह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रयोगांसह शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रांतील माहितीचा समावेश असलेले ‘कृषिक २०२६’ हे कृषी प्रदर्शन बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) येथे आजपासून (ता. १७) सुरू होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. .बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने एआय तंत्रज्ञानाबाबत नवे प्रयोग केले आहेत. या नव्या प्रकल्पांबरोबर शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची प्रात्यक्षिकेदेखील पाहण्याची संधी यंदाच्या प्रदर्शनात मिळेल. आजपासून २४ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हे प्रदर्शन माळेगाव ‘केव्हीके’च्या १३० एकरांच्या कार्यक्षेत्रावर पाहावयास मिळणार आहे..Agriculture Exhibition: वेल्हाळेतील कृषी प्रदर्शन नागरिकांनी गजबजले.राज्यपालांच्या संकल्पनेतून राज्य सरकार आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राबविलेले नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे अभियान शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरले आहे, अशी माहिती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली..Agrowon Agri Exhibition: अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात लाखोंची उलाढाल.‘कृषिक’मध्ये अनुभवता येणार नवतंत्रज्ञानाची पर्वणीउसाचे प्रति एकर दोनशे टन उत्पादन व खोडव्याचे दीडशे टन उत्पादन, नावीन्यपूर्ण फळ झाडांची लागवड, ५०० ग्रॅमचा कांदा, विविध पिकांची प्रात्यक्षिके, हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, कलमी भाजीपाला, विविध रंगांतील स्वीटकॉर्न, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके,.रोबोटिक तण नियंत्रण, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य दालन, कृषी संशोधन, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, अवजारे क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉल, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ड्रीप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.