Chala Baap Vachavuya Campaign: शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या वाढत्या आर्थिक संकटावर चर्चा करण्यासाठी दाभा (ता. कळंब) येथे गुरुवारी (ता. १२) महाराष्ट्रातील पहिली शेतकरी सरण परिषद पार पडली. कर्जबाजारीपणा, दुष्काळ, नापिकी आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव अशा विविध प्रश्नांवर या परिषदेतून आवाज उठविण्यात आला. ‘चला, बाप वाचवूया’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित या परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न राज्याच्या केंद्रस्थानी आणण्यासह गावागावांत हा लढा उभा करण्याचा निर्धार करण्यात आला. .या वेळी अध्यक्षस्थानी शेतकरी नेते रामजीवन बोंदर उपस्थित होते. परिषदेचे संकल्पक शेतकरीपुत्र ॲड. अमोल पाटील, शिवक्रांतिवीर महेश टेळे, ओमकार इरकर, सुभाष टेळे, शिवशंकर होनराव, राजाभाऊ करपे, नितीन भाकरे, अंगद दोरगे, संतोष हावडे, सूरज टेकाळे, डॉ. प्रकाश टेकाळे, कुलदीप करपे, राहुल खोडसे, राजाभाऊ पाटील, संतोष शिंदे, तानाजी पाटील, विष्णू काळे, सचिन टेळे, प्रकाश टेळे, सदस्य सुधाकर टेळे, श्यामराव पाटील, बालासाहेब टेळे आणि किरण टेळे यांची प्रमुख उपस्थिती होती..Farmer Issue: कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.‘एक पोरगा सरणावर असताना दुसऱ्या पोराचं लग्न थाटामाटात करणारा सरकार नावाचा बाप भानावर आहे का?’ असा थेट सवाल उपस्थित करीत परिषदेतून सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. एका बाजूला शेतकरी आत्महत्यांचे संकट गडद होत असताना दुसऱ्या बाजूला आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या खर्चाच्या चर्चा सुरू आहेत. धार्मिक भावना आणि उत्सवांना विरोध नसून शेतकऱ्यांच्या जगण्याला, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला आणि भविष्याला प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली..ग्रामीण भागातील कर्जव्यवस्थेतील आर्थिक पिळवणुकीचा मुद्दाही परिषदेत ऐरणीवर आला. बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारींचा उल्लेख करीत अशा कर्जव्यवस्थेवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पारदर्शक, कायदेशीर आणि सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली..Farmer Crisis : कष्टाच्या घामाची किंमत अवघी १० रुपये! गरिबांच्या संघर्षाची कहाणी.शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता, आयात-निर्यात धोरणातील बदल आणि कृषी क्षेत्राला मिळणारे धोरणात्मक पाठबळ या विषयांवरही चर्चा झाली. कृषी धोरणविषयक निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी क्षेत्रातील समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी दारूमुक्त गाव आणि व्यसनमुक्त ग्रामीण महाराष्ट्रासाठी ठोस धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली..शेतकऱ्यांच्या वर्गणीतून उभी राहिली परिषदया परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे आर्थिक पाठबळ किंवा मोठ्या प्रायोजकाची मदत न घेता शेतकऱ्यांनी स्वतःच्या वर्गणीतून हा उपक्रम उभा केला. गावातील नागरिकांनी घरातून पिठलं-भाकरी आणून पाहुणचार केला. परिषदेसाठी इंद्रजित टेळे, भैरवनाथ सावंत, आकाश टेळे, प्रदीप टेळे, वेदांत टेळे, उमाकांत इरकर आणि यशराज टेळे यांनी पुढाकार घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.