Farmer Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ‘चक्का जाम’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

Satara News : थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची (Agricultural Pump) करण्यात येणारी वीजतोडणी, ऊसतोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान या विरोधात बुधवारी (ता. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कऱ्हाड तालुक्यातील पाचवड येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष बापुराव साळुंखे, तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Farmer Protest
Farmer Protest : शेतीप्रश्न सोडवण्यासाठी ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर

या वेळी श्री. पाटील यांनी थकित वीजबिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजतोडणी करण्याचे सत्र राज्य सरकारने चालवले आहे. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही.

बुलडाण्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळपक्षमताही वाढली आहे, पण तोडणी मजुरांची संख्या मात्र कमी होत आहे.

याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीजबिल दुरुस्त करून द्यावी, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित ३७ टक्के वीज वाढ रद्द करावी, या साठी आंदोलन कऱण्यात आले.

दरम्यान, आंदोलनावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, अधिकारी श्री. जाधव यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com