Dhule News: येथील ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचा कामाचा आढावा व दप्तरी कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी भेट दिली..त्यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, विस्तार अधिकारी कपिल वाघ, विस्तार अधिकारी आर. बी. निकुंभे यांनी ग्रामपंचायत कामकाजाची अंतर्गत दप्तर तपासणी केली..Grampanchayat Budget : ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प आणि लेखे.अजीज शेख यांनी अमरधाम जि. प. केंद्रशाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक बागल, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बागल, पंकज बागल, चिंधा सैदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता कदम,.Samrudhha Panchayatraj Campaign : एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी.प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय बैसाने यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, सेविका व कर्मचारी उपस्थित होते. अजीज शेख यांनी ग्रामपंचायतीची गुणवत्ता ७८:५० असल्याने उत्कृष्ट कामाचे कौतुक केले..गावाची स्वच्छता, आरोग्य केंद्राचा आयुष्यमान योजनेतील सहभाग, केंद्रशाळेच्या बोलक्या भिंतींसह साफसफाई, ग्रामपंचायत प्रशासनाची उत्कृष्ट कामगिरी याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सरपंच व सदस्यांनी करावयाची कामे, लोकसहभागाबाबत मार्गदर्शन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.