Rabi Crops MSP : केंद्राकडून रब्बी पिकांची एमएसपी जाहीर, ६ पिकांना दिलासा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली.
Rabi Crops MSP
Rabi Crops MSPagrowon
Published on
Updated on

Rabi Crops MSP Increase : केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांची एमएसपी जाहीर केली. रब्बी हंगाम २०२४-२५ साठी गव्हाची किंमत २२७५ रुपये प्रति क्विंटल तर मोहरीचा भाव ५६५० रुपये प्रतिक्विंटल राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली यामध्ये निर्णय घेण्यात आला.

कोणत्या पिकांचा MSP किती वाढला?

एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ मसूरसाठी प्रति क्विंटल ४२५ रुपयांनी करण्यात आली आहे. यानंतर मोहरीला २०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला. गहू आणि करडईसाठी प्रतिक्विंटल १५०-१५० रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर बार्लीसाठी ११५ रुपये आणि हरभऱ्यासाठी १०५ रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.

सरकारने सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी २ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये गहू प्रति क्विंटल २ हजार २७५ रुपये, बार्ली १ हजार ८५० रुपये, हरभरा ५ हजार ४४० रुपये, मसूर ६ हजार ४२५ रुपये मोहरी ५ हजार ६५० रुपये, सूर्यफूल ५ हजार ८०० रुपये MSP मंजूर करण्यात आली आहे.

एमएसपीमध्ये तृणधान्यात - गहू, भात, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि जो. कडधान्यात- हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद. तेलबियांमध्ये- मोहरी, सोयाबीन, तीळ, करडई, भुईमूग, सूर्यफूल, नायजर बियाणे. रोख- ऊस, कापूस, कोपरा आणि कच्चा ताग यांचा समावेश होतो.

Rabi Crops MSP
Export Non Basmati Rice : केंद्राचा सात देशांना दिलासा; गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास दिली मान्यता

१ एप्रिल २०२४ पासून दर लागू होणार

रब्बी हंगामातील गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई या सहा मुख्य पिकांना सरकार एमएसपी देणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या खरेदी हंगामात गव्हाची सरकारी किंमत २२७५ रुपये प्रति क्विंटल असेल. बार्लीचा भाव १८५०, हरभरा ५४४०, मसूर ६४२५, मोहरीचा भाव ५६५० आणि करडईचा भाव ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल राहणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ च्या घोषणेनुसार रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पिकांचा MSP कृषी खर्च आणि किमती आयोगाने (CACP) खर्चाच्या किमान १.५ पट पातळीवर निश्चित केला आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर किमान ५० टक्के नफा जोडून एमएसपी निश्चित केला जातो.

केंद्र सरकारने दावा केला आहे की गव्हाचा एमएसपी त्याच्या किमतीच्या १०२ टक्के फरकाने निश्चित केली आहे. एमएसपी मोहरीसाठी ९८ टक्के, मसूरसाठी ८९ टक्के, हरभरा आणि बार्लीसाठी ६०-६० आणि करडईसाठी ५२ टक्के मार्जिन निश्चित करण्यात आले आहे. एमएसपी वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com