Indian census : देशभरात तब्बल १५ वर्षांनी जनगणना करण्यात येणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. याबाबतच भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी गुरुवारी (ता.२२) अधिसूचना काढली आहे..या अधिसूचनेमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या ३३ प्रश्नांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पूर्वी २०२० मध्ये जनगणनेसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली होती. परंतु कोविड-१९ च्या महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामध्ये ३१ प्रश्न होते. आता मात्र ३३ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे..राजपत्रित अधिसूचनेत ३३ प्रश्नांची रूपरेषा आखण्यात आली आहे. यामध्ये घर, कुटुंब, वाहन संबंधित प्रश्न आहेत. त्याचे उत्तरे कुटुंब प्रमुखाने देणे अपेक्षित आहे. तसेच पिण्याचे पाणी, घरातील फरशी व छतांसाठी वापरलेले साहित्य, विवाहित जोडप्याची संख्या, धान्याचा वापर, कुटुंब प्रमुखाचे लिंग, जीवनावश्यक वस्तुंची माहिती आदी प्रश्नांचा समावेश आहे..केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते की, जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर असेल. यामध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्राशासित प्रदेश त्यांच्या येथील काम ३० दिवसात पूर्ण करेल. तसेच घराची यादी सुरु होण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना स्वत: माहिती भरण्याचा पर्याय देण्यात येईल..डिजिटल पर्याय?२०२७ ची जनगणना पूर्णत: डिजिटलपद्धतीने होणार आहे. सुमारे ३० लाख कर्मचारी मोबाईल अॅपच्या मदतीने माहिती गोळा करणार आहेत. त्यामुळे जनगणना पेपरलेस होणार आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, ब्रिटीश काळात १९३१ सालापर्यंत जातनिहाय जनगणना करण्यात आली होती..३३ प्रश्न कोणते?- इमरात क्रमांक- घर क्मांक- घराच्या फरशीचे साहित्य-घराच्या भिंतीचे साहित्य-घराच्या छताचे साहित्य-घराचा वापर- घराची स्थिती.- कुटुंब क्रमांक- कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या- कुटुंब प्रमुखाचे नावे- कुटुंब प्रमुखाचे लिंग- कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/जमाती/ इतर प्रवर्गातील आहे?.- मालकीची स्थिती- कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची संख्या- कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या- पिण्याचे पाण्याचे मुख्य स्त्रोत- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता- विजेचा मुख्य स्त्रोत.- शौचालयाची उपलब्धता- शौचालयाचा प्रकार- सांडपाणी निचरा- स्नानगृहाची उपलब्धता.- स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन- स्वयंपाकासाठी जाणारे मुख्य इंधन- रेडीओ/ट्रान्झिटर- टीव्ही- इंटरनेटची उपलब्धता- लॅपटाॅप/संगणक- टेलिफोन/मोबाईल फोन/ स्मार्टफोन- सायकल/स्कुटर/मोटारसायकल/मोपेड- कार/जीप- कुटुंबाचे धान्य- मोबाईल क्रमांक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.