Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

Marine Tourism : वाढत्या उद्योग-व्यवसायाबरोबरच नागरीकरणाच्या विस्तारामुळे अतिसंरक्षित कांदळवने धोक्यात आली आहेत.
Kandalwan
KandalwanAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : वाढत्या उद्योग-व्यवसायाबरोबरच नागरीकरणाच्या विस्तारामुळे अतिसंरक्षित कांदळवने धोक्यात आली आहेत. सागरी पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना सातत्याने करण्यात आल्या; मात्र तरीही कांदळवन क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्‍याचे समोर येत आहे. यावर उपाय म्हणून कांदळवनांवर २४ तास सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यासह मुंबई व ठाणे जिल्ह्यातील १९५ अतिसंवेदनशील कांदळवनांच्या ठिकाणी ६६९ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांसह त्यांच्या पाच वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ११९.८८ कोटी रुपयांच्या प्रस्‍तावास राज्‍य सरकारने मंजुरी दिली आहे.

Kandalwan
सोनगाव ग्रामस्थांची कांदळवन सफारीला चालना

कांदळवन क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत आहेत. तर काही ठिकाणी कांदळवनांची कत्तल करून गोदामे आणि इमारती उभ्‍या करण्यात येत असल्‍याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यापुढे कांदळवनांची हानी टाळण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र आणि मुंबईतील कांदळवन कक्षाच्या ताब्यातील महानगर क्षेत्राचे सर्वेक्षण व पडताळणी केली असता एकूण १९५ ठिकाणे संवेदनशील निष्पन्न झाली आहेत. या सर्व १९५ ठिकाणी एकूण ६६९ सीसीटीव्ही बसवण्यास मान्यता मिळाली आहे. या ठिकाणांवरील कांदळवने धोकादायक स्थितीत आहेत. दलदल क्षेत्रात लावण्यात येणारे कॅमेरे सौरऊर्जेवर चालणारे असतील. यात आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.

Kandalwan
Aquaculture Business : कांदळवन प्रकल्पाने दिला देवली ग्रामस्थांना रोजगार

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण तालुक्यांतील कांदळवन क्षेत्रे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा- भाईंदर, भिवंडी येथील ही एकूण १९५ संवेदनशील कांदळवन ठिकाणांवर ६६९ सीसीटीव्ही तसेच पाच वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीच्या ११९.८८ कोटी इतक्या खर्चाच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, दोन टप्प्यांत राबवण्याकरिता हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई यांनी दोन महिन्यांपूर्वीच राज्‍य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला.

कसे काम करणार सीसीटीव्ही?

जिल्ह्यात उरण, पनवेल तालुक्यातील इमारतीची बांधकामे सुरू आहेत, अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यातील डेटा सर्व्हरमध्ये आणि नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष पडताळणीसाठी स्क्रीनवर पाहता येईल. कॅमेरा टॉवरवरच लाऊड स्पीकर लावला जाणार आहे.

कांदळवन असलेल्‍या ज्‍या क्षेत्रात नागरीकरण, औद्योगिकीकरण होत आहे, अशा अतिसंवेदनशील ठिकाणीच कॅमेरे लावले जाणार आहेत. यातून प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट असून भविष्यात अन्य ठिकाणीही कॅमेरे लागतील.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष, रायगड विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com