Cotton Market
Cotton MarketAgrowon

CCI Decision : ‘सीसीआय’कडून कापूसदरात प्रति खंडी ५०० रुपये कपात

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सीसीआय’ने देखील कापसाच्या विक्रीसाठी प्रति खंडी (३५६ किलो रुई) दरात ५०० रुपयांची कपात केली आहे.
Published on

Nagpur News : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सीसीआय’ने देखील कापसाच्या विक्रीसाठी प्रति खंडी (३५६ किलो रुई) दरात ५०० रुपयांची कपात केली आहे. त्यानुसार अहमदाबादमध्ये मध्यम लांबीच्या (२८ एमएम) कापसाकरिता ५१ हजार ६०० तर अकोल्यामध्ये लांब धाग्याच्या (३० एमएम) कापसाकरिता ५३,६०० रुपयांचा दर आकारला गेला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीआयकडे २०२३-२४ या वर्षातील साठा त्यासोबतच यंदाच्या हंगामात ३२ लाख गाठींपेक्षा अधिक खरेदी केलेला कापूस आहे. देशांतर्गत बाजारात सीसीआयकडेच कापसाचा सर्वाधिक साठा असल्याने कापसातील तेजी-मंदी ही सीसीआयकडून होणाऱ्या विक्रीवर अवलंबून राहणार आहे.

Cotton Market
Cotton Subsidy : कापूस उत्पादकांना द्या ५०० कोटींचे अनुदान

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) गुरुवारी (ता. २६) सुमारे ४९०० कापूस गाठींची विक्री केली. त्यातील ३१०० गाठींची विक्री स्पिनींग मिलधारकांना करण्यात आली, तर उर्वरित १८०० गाठींची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. स्पिनिंग मिलधारकांची मागणी वाढल्याने गुजरातमध्ये कापसाच्या दरात काहीशी सुधारणा अनुभवण्यात आली. अहमदाबादमध्ये शंकर-६ या लांब धाग्याच्या कापूस वाणाचे दर ५३,७०० रुपये प्रति खंडीवर (३५६ किलो रुई) पोहोचले.

पंजाब, राजस्थानमध्ये असा आहे दर

पंजाबमध्ये रुईचा लिलाव दर ५५१० ते ५५२० रुपये प्रति मन (३७.३२ किलो रुई) याप्रमाणे होता. राजस्थानमध्ये हाच दर ५५२० ते ५५८० रुपये प्रति मन असा होता.

Cotton Market
Cotton Subsidy for Drip : कापूस उत्पादकांना ५०० कोटी रुपयांचे अनुदान द्या; सुधारित वाण देण्याचीही `सीएआय`ची मागणी

देशभरात २.२ लाख कापूस गाठींची आवक

देशभरातील बाजारात २ लाख २ हजार २०० गाठी (प्रति गाठ १७० किलो) याप्रमाणे कापसाची आवक झाली आहे. कापसाला ७५२१ रुपयांचा हमीभाव असून, खुल्या बाजारात कापसाला ६९०० ते ७२०० रुपयांचा दर मिळत आहे. येत्या काळात कापसाचा हाच दर स्थिर राहणार असल्याची माहिती विपणन क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

२९९ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात चालू हंगामात २९९.२६ लाख गाठी इतक्‍या कापसाचे उत्पादनाचा अंदाज आहे. २०२३-२४ या हंगामातील ३२५.२२ लाख गाठीच्या तुलनेत ही उत्पादकता कमी राहणार आहे. दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने ३०२.२५ लाख गाठीच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे.

बाजारात कापसाला ६९०० ते ७२०० रुपयांचा दर मिळत आहे. हंगामात हाच दर राहील, अशी अपेक्षा आहे. शनिवारी (ता. २८) हिंगणघाट बाजार समितीत कापसाला ७१४० रुपयांचा दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूसदर दबावात आहेत.
गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com