Sugarcane Farming: उसातील तुरा येण्यामागील कारणे, परिणाम अन् उपाय
Sugarcane Management: राज्यातील काही भागांमध्ये ऊस पिकाला तुरा दिसून येत आहे. तुरा आल्यानंतर उसाची वाढ थांबते, कांडीमध्ये साठवलेली साखर तुरा निर्मितीसाठी वापरली जाते. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी तुरा येण्याची कारणे, त्यातून होणारे नुकसान आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.