Cauliflower Prices : फुलकोबीचा दर पडला; काढणी खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर, पीक शेतात कुजवण्याची वेळ

Cauliflower Rate : फुलकोबीच्या पडलेल्या दरामुळे काढणी व वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर बसत असल्याने शेतकऱ्यांनी फुलकोबीची काढणीच बंद केली आहे.
Cauliflower Prices
Cauliflower Pricesagrowon
Published on
Updated on

Cauliflower Prices Fall Kolhapur : गेल्या तीन-चार आठवड्यापासून फ्लॉवरचा दर कमी राहिला आहे. चार दिवसांपासून तर त्याचा नीचांक गाठला असून किलोला तीन रुपये झाला आहे. शेतकऱ्यांना हा दर परवडत नसून काढणी व वाहतुकीचा खर्च अंगावर बसत आहे. त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी बंद केली आहे.

महिनाभरापासून हवामानाचीस्थिती बिघडल्याने भाजीपाला पिकवणे शेतकऱ्यांना जिकिरीचे व खर्चिक झाले आहे. या निसर्गाच्या संकटाला धैर्याने सामोरे जात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फ्लॉवरला अपेक्षित दर मिळेल या आशेपोटी उत्पादनाचा वाढीव खर्च शेतकरी सोसत होता.

मात्र, २० ते २५ दिवसांपासून फुलकोबीचा दर अवघ्या ५ रूपयांच्या खाली आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी किलोला पाच ते सात रुपयांपर्यंत आलेला दर आता ३ रुपयांपर्यंत आला आहे. शहरांच्या बाजारपेठेत २० किलोच्या पोत्याला ६० ते ९० रुपये मिळत आहेत. स्थानिक बाजार पेठेत १२ गड्यांच्या पोत्याला ६० ते ८० रुपये मिळत आहेत.

Cauliflower Prices
Sugarcane Productivity : अनुभव, व्यवस्थापनातून टिकवली उसाची उत्पादकता

फुलकोबी विकून मिळालेल्या रकमेत काढणीचा खर्चही भागेना. उलट वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर बसत आहे. परिणामी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांनी फ्लॉवर काढणी थांबवली असून दोन-चार दिवसांत दर वधारेल अशी अपेक्षा आहे. दर वाढेल व घातलेला खर्च तर निघेल या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षीचा फ्लॉवरचा हंगामच नुकसानीत गेला असल्याचे मत शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

फ्लॉवर उत्पादक शेतकरी रावसो खिचडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबई, पुणे, हैदराबाद, बेळगाव, तर स्थानिक बाजारपेठेत कोल्हापूर, वडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, आष्टा येथे फुलकोबीची मागणी असते. गेले काही दिवस फुलकोबीचे दर पडलेले आहेत. सध्या तीन रुपये दर असल्याने काढणीचा आणि वाहतूक जास्त होत आहे. त्यामुळे फुलकोबी काढणी आम्ही थांबवले आहे". असे खिचडे यांनी सांगितले.

फ्लॉवरचे अधिक उत्पादन या भागात जास्त

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ व हातकणंगले तालुक्यात-नांदणी, दानोळी, कोथळी, उमळवाड, कुंभोज, नरंदे तर सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात तुंग, दुधगाव, समडोळी, कवठेपिरान, आष्टा आदी भागांत फ्लॉवरचे अधिक उत्पादन घेतले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com