Cashew Farmers: हवामानातील सततच्या बदलाने काजू मोहोर करपण्यासह गळत आहे. परिणामी नेसरी भागातील काजू उत्पादन धोका पातळीवर आहे. परिणामी काजूचे उत्पन्न घटण्याची शक्यता अधिक आहे. .नेसरी विभागातील अर्जुनवाडी, कानडेवाडी, सरोळी, तळेवाडी, तारेवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, बिद्रेवाडी, हेब्बाळ-जलद्याळ, लिंगनूर, वाघराळी, कुमरी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. पाऊस, दाट धुके, थंडी असे वातावरण होत असल्याने ते काजूला अपायकारक ठरत आहे. हवामानातील अचानक बदलाने काजू मोहोर गळत आहे. उसाला पर्याय म्हणून या भागातील अनेक शेतकरी काजू उत्पादनाकडे वळले आहेत. .Climate Change Impact: गव्हाला बसतोय हवामान बदलाचा फटका.यंदाही काजू बागेतील मशागत, औषध फवारणी यावर बागायतदारांनी खर्च केला आहे. गेल्या हंगामात काजूला प्रतिकिलो १४० ते १७० रुपयांचा दर मिळाला. दोन-तीन वर्षांत सातत्याने काजूच्या दरात चढ-उतार आहे. चार-पाच वर्षांपूर्वी काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकरीवर्ग सुखावला होता. आता हवामानातील बदलाने काजूचा मोहोर गळण्याबरोबरच काही ठिकाणी करपू लागला आहे..Climate Change Impact: रायगड जिल्ह्याच्या वातावरणीय बदलाचा रोडमॅप तयार.उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने बागायतदारांसमोर संकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, काजूचे उत्पादन कमी येणार असल्याने त्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. उत्पादन कमी आणि दर अधिक यामुळे काजूवर प्रक्रिया करून काजूगर निर्मिती करणाऱ्या उद्योजकांसमोर काजू खरेदीचा संभ्रम तयार झाला आहे..उत्पादक-उद्योजकांसमोर आव्हानकच्चा काजूचे दर वाढल्याने कारखानदारांनाही काजूवर प्रक्रिया करणे परवडण्यासारखे नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक छोटे उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच दुसऱ्या बाजूने काजू बागेवर मशागत, औषधांवर केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता बागायतदार शेतकऱ्यांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.