Carbon Sugarcane Farming: शाश्वत उत्पादन,पर्यावरण संवर्धनासाठी कार्बन ऊस शेती
Agri Innovation: कार्बन ऊस शेती हा शाश्वत पर्याय आहे. यामध्ये ऊस उत्पादनासोबतच मृदा सुपीकता वाढविणे, कार्बन संवर्धन, हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धतींचा अवलंब केला जातो. व्यवस्थापनात सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, आंतरमशागत, ठिबक सिंचन, पीक अवशेष व्यवस्थापन तसेच जैवविविधता संवर्धन तंत्रांचा योग्य समन्वय साधला जातो.