Farming Innovation: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्बन क्रेडिट या विषयावर गुरुवारी (ता. २६) कार्यशाळा आयोजित करण्यात आली. .कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते. आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील, ग्रो इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उषा बारवाले झेहर, संचालक अविनाश सोनी हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कार्बन क्रेडिटचे नोडल अधिकारी तथा संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर उपस्थित होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विनय सहगल, डॉ. आरती भाटिया, एकात्मिक शेती पद्धती विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद झा हे ऑनलाइन उपस्थित होते..Natural Farming Training: ‘सिद्धगिरी’त कृषीसखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण.डॉ.इंद्रमणी म्हणाले, की मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट ही जोखीम व्यवस्थापनाची प्रभावी संधी ठरू शकते. डॉ. पाटील म्हणाले, की कार्बन शेतीचा व्यापक प्रसार करण्यावर भर द्यावा. डॉ. बारवाले म्हणाल्या, की पंजाब राज्यात कार्बन क्रेडिट मिळविण्यात यश आले. देशातील पाच राज्यांत प्रकल्प सुरू आहेत. मराठवाड्यात शेती पद्धतींमध्ये आवश्यक बदल करून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यास त्या घटेचे रूपांतर कार्बन क्रेडिटमध्ये होईल. डॉ. सहगल म्हणाले, की कार्बन क्रेडिटसाठी पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागेल..Agriculture Workshop: वनस्पती अनुवंशिक संसाधनांच्या संरक्षणावर ‘केव्हीके’त कार्यशाळा.डॉ. भाटिया यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील विविध मॉडेलची दिली. डॉ. झा म्हणाले, की भारतात कार्बन क्रेडिट नोंदणीसाठी सक्षम संस्था कार्यरत नसल्यामुळे परदेशी संस्थांकडून नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. विद्यार्थ्यांसाठी कार्बन शेती विषयक संशोधन प्रकल्प सुरू करणे,.सामंजस्य करार करणे तसेच अभ्यास मंडळ व सल्लागार समित्यांमध्ये तज्ज्ञांचा समावेश करणे यावर चर्चा झाली. कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांच्याकडे डेटा संकलन व विश्लेषणाची जबाबदारी सोपविण्यात आली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. हिराकांत काळपांडे आदीसह शास्त्रज्ञ उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.