Manja Production : मांजा उत्पादनावर मर्यादा आणू शकतो का? : उच्च न्यायालय

High Court to Bureau of Indian Standards : धोकादायक ठरलेल्या नायलॉन मांजाच्या निर्मितीवर मर्यादा आणू शकतो का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय मानक ब्युरोला (बीआयएस) केली आहे.
High Court on Manja Production
High Court on Manja ProductionAgrowon

Nagpur News : धोकादायक ठरलेल्या नायलॉन मांजाच्या निर्मितीवर मर्यादा आणू शकतो का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय मानक ब्युरोला (बीआयएस) केली आहे. या बाबत २२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. मांजामुळे होणारी जीवितहानी लक्षात घेत न्यायालयाचे जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादाने २०१७ साली नॉयलॉन मांजाचे उत्पादन, वापर, विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, मांजा उद्योगाचे नियमितीकरण (रेगुलायझेशन) न झाल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून विविध नावाने धोकादायक नॉयलॉनची विक्री सर्रासपणे होत आहे.

High Court on Manja Production
Gift to PM Modi : पंतप्रधान मोदींना महिला देणार मिलेट पदार्थांची भेट

ऑनलाइन कंपन्या देखील मानकीकरणाचे (स्टँडर्डायझेशन) कारण पुढे करत नॉयलॉनच्या विक्रीवर संपूर्ण प्रतिबंध घालण्याचे टाळत आहे. या पार्श्वभूमीवर मांजा उद्योगाचे नियमितीकरण तसेच मानकीकरण करता येईल का?

High Court on Manja Production
Cereal Effect : भरडधान्य वर्षाचे फलित काय?

या बाबत बीआयएसने माहिती सादर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत बीआयएसला या बाबत उत्तर सादर करायचे आहे. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. देवेंद्र चौहान यांनी बाजू मांडली.

प्रतिबंधात्मक काय पावले उचलली?

नायलॉन मांजा विक्री प्रकरणात आडकाठी धोरण ठेवणाऱ्या फेसबुकवर कारवाई सुरू करण्याचे मौखिक आदेश मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते. कारवाईचा धोका लक्षात येताच अखेर फेसबुकने माघार घेतली आहे. फेसबुकने ‘मार्केट प्लेस’ या व्यासपीठावरील विक्री थांबविल्याची माहिती न्यायालयाला दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com