Akola News: केळी पिकामध्ये घडांचे वजन, फळांची गुणवत्ता आणि एकूण उत्पादन वाढविण्यासाठी बंच फीडिंग तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला असून जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रात्यक्षिकांद्वारे त्याचा प्रसार केला जात आहे..अकोट तालुक्यातील आंबोडा येथे शेतकऱ्यांसाठी केळी पिकातील बंच फीडिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या तज्ज्ञ गजानन तुपकर यांनी सांगितले की, केळीमध्ये घड बाहेर आल्यानंतर योग्य पोषण व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. .Banana Farming: खानदेशात दर्जेदार केळी आवकेत वाढ.बंच फीडिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास चांगले परिणाम मिळतात. हे प्रात्यक्षिक शेतकरी रघुनाथ धुळे यांच्या केळी बागेत घेण्यात आले. कार्यक्रमास आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी, श्री. आसोले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते..Banana Farming: केळी घडांचा दर्जा राखण्यावर भर.काय आहे बंच फीडिंग तंत्रज्ञान ?बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. केळी पिकामध्ये घडाचा आकार, वजन आणि दर्जा वाढविण्यासाठी ही सोपी पद्धत वापरली जाते. केळफूल निघाल्यानंतर झाडाला अतिरिक्त अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी बंच फीडिंग तंत्राचा वापर केला जातो. .या पद्धतीत युरिया ७.५ ग्रॅम, सल्फेट ऑफ पोटॅश ७.५ ग्रॅम, कुजलेले शेणखत ५०० ग्रॅम आणि १०० मिलि पाणी यांचे मिश्रण पॉलिथीन पिशवीत भरले जाते. केळफूल कापल्यानंतर देठाचा भाग मिश्रण भरलेल्या पिशवीत टाकून ती बांधली जाते. त्यामुळे अन्नद्रव्ये थेट घडाला उपलब्ध होतात. परिणामी केळीचे घड मोठे, भरदार आणि वजनदार तयार होतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.