Traditional Farming: पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेतकरी आता बाजारपेठ आणि आर्थिक परतावा लक्षात घेऊन विविध पिकांकडे वळत आहेत. यामध्ये मसालेवर्गीय हळद पिकाची लागवड जिल्ह्यात सातत्याने वाढत असून यंदाच्या खरीप हंगामात हळदीचे क्षेत्र तब्बल ११ हजार ४०२ हेक्टरवर पोहोचले आहे. हवामान बदल, पारंपरिक पिकांची घटती उत्पादकता आणि बाजारातील दरातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांनी हळदीसारख्या पर्यायी पिकाला पसंती दिली आहे..जिल्ह्यात खरीप पिकांचे एकूण क्षेत्र सात लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून ते चार ते साडेचार लाख हेक्टरदरम्यान राहते. याशिवाय तूर, कपाशी, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मागील काही वर्षांत बदलते हवामान, उत्पादन खर्चातील वाढ आणि अपेक्षित दर न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचा कल पर्यायी पिकांकडे वाढला आहे..Turmeric Farming: फिका रंग हळदीचा.हळदीला बाजारपेठ उपलब्ध झाल्याने या पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. जिल्ह्यात मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या खरेदी-विक्रीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय जानेफळ येथील विदर्भ कृषी समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी हळद खरेदी, विक्री आणि प्रक्रियेमध्ये सक्रिय झाली आहे. या कंपनीने यंदा सुमारे चार हजार क्विंटलपेक्षा अधिक हळदीची खरेदी केली आहे. प्रक्रिया केलेली हळद पावडर पॅकिंग करून बाजारात आणली. .Turmeric Farming: हळद लागवडीत योग्य कंद निवड आणि बीजप्रक्रिया कशी करावी?.तालुकानिहाय विचार करता मेहकर तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ४३३ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ लोणार तालुक्यात ३ हजार ९६९ हेक्टर, चिखली तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर, सिंदखेडराजा तालुक्यात ९०० हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे. याशिवाय बुलडाणा १७३.२ हेक्टर, मोताळा १ हेक्टर, खामगाव १६७ हेक्टर, शेगाव ९ हेक्टर, नांदुरा ३.१ हेक्टर, जळगाव जामोद २५ हेक्टर, संग्रामपूर ११६ हेक्टर, देऊळगाव राजा १७४.२ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे..हळद पिकासाठी वाढती बाजारपेठ, प्रक्रिया उद्योगांची उपलब्धता आणि चांगल्या दराची शक्यता आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्यातील हळद क्षेत्र आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांना या पिकाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याची यंत्रणा काम करीत आहे.- संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.