Farmer Issues: जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांतील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या नदी-नाल्यांचे युद्धपातळीवर वैज्ञानिक पद्धतीने खोलीकरण करण्यात यावे. अन्यथा अतिवृष्टीमुळे दरवर्षी हजारो एकर सुपीक शेती वाहून जाण्याचे संकट कायम राहील, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तातडीने पायलट प्रकल्प हाती घेण्याचीही मागणी केली..या भागात ३१ जुलैच्या मध्यरात्री जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात तब्बल २५५ मिलिमीटर पावसाने कहर केला. या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी भेंडवळ खुर्द, भेंडवळ बुद्रुक, चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, पळसखेड, येनगाव, वडशिंगी, उटी खुर्द, उटी बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, खेर्डा बुद्रुक, सातळी, जळगाव शहर आदी १५ गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली..Assam Floods: जीव वाचला; पण संसार वाहून गेला!.या वेळी अक्षय पाटील, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, भागवत वाघ, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, असलम शेख, दीपक पाटील, दिलीप बोबळे, अझहर शेख, राजेंद्र राखोडे, त्रिलोकसिंह राजपूत, संतोष गणगे, कय्यूम खान, सदाशिव जाणे, तुकाराम पाटील, प्रमोद तिजारे, अनंता मारोडे, विष्णू कुकडे, राजू पाटील शित्रे, प्रणव देशमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Bhima Flood Issue: ‘भीमे’च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली....अन्यथा आंदोलन करूया वेळी तुपकर यांनी नुकसान पंचनाम्यांतील त्रुटींवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. जिथे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तेथे कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला..आठवडाभरात शंभर टक्के नुकसानभरपाई जाहीर करून ती थेट खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.